JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'पंतप्रधान मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधी कुठे?'

'पंतप्रधान मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधी कुठे?'

‘आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी…’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत, पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अजूनही शुभेच्छा दिल्या नाही, ते कुठे आहे? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या ना त्या मुद्यांवरून भाजपचे आमदार नितेश राणे हे महाविकास आघाडी सरकारवर नेहमी टीका करत असता. आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ‘आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार तास उलटले तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, साधं ट्वीट सुद्धा राहुल गांधी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला सुद्धा ट्वीट केले नव्हते, हीच महाविकास आघाडी आहे का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थितीत केला आहे.

तसंच नितेश राणे यांनी शरद पवार आणि वडील नारायण राणे यांचा एक फोटो ट्वीट शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

तर दुसरीकडे, साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा,आपणास दीर्घायुष्य लाभो’,अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या