मुंबई, 20 जून : मराठी आणि दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी पाहिलेला एक प्रसंग सर्वांसमोर मांडला आहे. सयाजी शिंदे हे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील (Ghatopar Mankhrd Link Road) नव्या उड्डाणपुलावरून शनिवारी (18 जून) प्रवास करत होते. त्यावेळी काही मुलं पुलावर बगळ्यांची शिकार करतांना त्यांनी पाहिलं. मात्र इतरांप्रमाणे ते पाहून तसंच पुढे निघून जाणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणूनच त्यांनी गाडी बाजूला घेऊन बगळ्यांची शिकार करणाऱ्या या मुलांना चांगलंच झापलं. यातील काही मुलं अल्पवयीनही होती. या संपूर्ण प्रकारची माहिती त्यांनी पोलिसांनाही दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. यावेळी घडलेला सगळा प्रकार त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. बगळ्यांची शिकार का करता अशी विचारला सयाजी शिंदे यांनी केली. सुरुवातील उपस्थित मुलांनी सयाजी शिंदे यांनाच प्रतिप्रश्न केले. मात्र त्यानंतर क्षुल्लक कारणे देऊ लागले. घरातील काही जण आजारी आहेत त्यांना औषधासाठी बगळ्यांची शिकार करत असल्याचंही काहींनी सांगितलं. मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, पाहा Video यानंतर सयाजी शिंदे येथे आल्याचे समजताच परिसरातील अनेक लोक तिथे जमा झाले. त्यावेळी त्या मुलांनी तेथून पळ काढला. या उड्डाणपुलावर तसंही उभं राहणे धोकादायक आहे. तसेच बगळ्यांची होत असलेली कत्तल हे दृश्य अस्वस्थ करणारं होतं असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. आधी नाव विचारलं; डिलिव्हरी बॉयची जात समजताच जेवणाची ऑर्डर स्विकारण्यास नकार देत केलं धक्कादायक कृत्य बगळ्यांचे थवे या उड्डाणपुलाच्या बाजूनेच भरारी घेत असतात. त्याच वेळी बाजूच्या वस्तीतील काही मुले ही या उड्डाणपुलावर येऊन या बगळ्यांची शिकार करून घरी घेऊन जातात. हा सगळा प्रकार रोखला गेला पाहिजे आणि या मुलांवर कारवाई देखील झाली पाहिजे अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे.