कर्नाटक निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई, 13 मे : कर्नाटकात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. काँग्रेस सध्या 110 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 79 जागांवर पुढे आहे याशिवाय जेडीएस 28 तर इतर उमेदवार 7 जागी आघाडीवर आहेत. कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय. यावेळी त्यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटावरून झालेल्या राजकारणावरूनही निशाणा साधला. द केरळ स्टोरी या चित्रपटावरूनही प्रचंड राजकारण झालं. याची चर्चा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकमध्ये कोणतीही स्टोरी चालली नाही, फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा ही भाजपच्या डोक्यावर पडली. बजरंग बली हा श्रीरामांचा भक्त होता, पण तो जनतेच्या आणि सत्याच्या बाजूने गेला आहे. बेळगावमध्येही भाजप-काँग्रेसमध्येच टक्कर; महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का? महाराष्ट्रातून काही लोक गेले होते, जिथे जिथे गेले तिथे पराभव झाला होता. महाराष्ट्रातून एक टोळीही गेली होती. पण लोकांनी साफ नाकारलं आहे. कर्नाटकाचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षासाठी सत्तेचा दरवाजा उघडणार असेल. ही लोकांची भावना आहे. कर्नाटक निकाल हा लोकांची मन की बात असल्याचंही राऊत म्हणाले. कर्नाटकात भाजपच्या नेत्यांनी तंबू ठोकला होता. पण मोदी आणि शहा यांना लोकांनी झिडकारलं असल्याचंही राऊत म्हणाले. Karnataka Election result Live Updates : कर्नाटक निवडणूक निकालाचे लेटेस्ट अपडेट वाचा एका क्लिकवर पंतप्रधान मोदींचं कुणी ऐकलं नाही. अमित शहांचं कुणी ऐकलं नाही. राज्या राज्यातून ज्या टोळ्या आल्या आहेत. ती लोकं आता प्रचाराला बळी पडले नाही. आताही काही तरी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्रासारख्या राज्यातून फौजाच्या फौजा पाठवल्या, लोक कमी खोके होते, पण लोकांनी खोके नाकारले. योगी आदित्यनाथ गेले होते. सगळ्या नेत्यांनी तंबू ठोकले होते, पण लोकांनी नाकारला.