मुंबई, 26 ऑक्टोबर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी उत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांच्या बहीण जास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, आरोप करणाऱ्यांनी पुरावेही सादर करावे असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या मार्फत मिळालेलं एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्राच्या आधारे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवर आरोप केले आहेत, कोर्टात केलेले नाहीये, मीडिया ट्रायल कशी होई शकते. असं पत्र कुणीही लिहू शकतं, हे सर्व आरोप खोटे आहेत. माझे पती नक्कीच या सर्वांतून बाहेर पडतील. नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल माझा पती खोटारडा नाही, रोज काय काय स्पष्टीकरण देत बसायचं? समीर वानखेडेंच्या वडिलांनी आधीच जन्म दाखला सादर केला आहे. समीर वानखेडे यातून नक्कीच बाहेर येतील. त्यांना अडकवण्याचा आणखी प्रयत्न होईल मात्र, हे आरोप सिद्ध होणार नाहीत. सत्याचा नेहमी विजय होतो. समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करतात, ते अनेकांना खटकतं. आम्ही नेहमीच लढत राहू. नवाब मलिकांच्या आरोपांना वेळच उत्तर देईल असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. मलिकांना क्रांती रेडकरने दिल्या शुभेच्छा मी नवाब मलिकांना केवळ इतकंच सांगू इच्छिते की, मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुमचं कुटुंब चांगलं रहावं, आनंदी रहावं. आमच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. मराठी असल्याचा अभिमान पण, धमक्या येतात हे सुद्धा तितकेच सत्य आहे. जातीवरुन केलेले खोटे आरोप सहन करणार नाही. सोशल मीडियात ट्रोल करणाऱ्यांचा शोध लावणार, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्या देणाऱ्यांचा लवकरच पर्दाफाश होईल असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं. क्रांती रेडकर आणि जास्मिन यांनी म्हटलं, पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्विट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता? मंत्री म्हणून सोशल मीडियाचा योग्य वापर करा, नवाब मलिकांना आवाहन केलं आहे. समीर वानखेडेंच्या बदलीने कुणाचा फायदा? असा सवालही विचारण्यात आला आहे. SPECIAL 26 चा लेटरबॉम्ब टाकत नवाब मलिकांनी केले गंभीर आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी (NCB) अधिकारी सचिन वानखेडे (Sachin Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे… ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 26 प्रकरणांतून फसवणूक नवाब मलिकांनी म्हटलं, आज मी एक पत्र ट्विट केले आहे. हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी. इतर पुरावे हळूहळू बाहेर काढणार पत्रात ज्या प्रकारे उल्लेख आहे त्या प्रमाणे हे सगळं आहे. माझ्याकडे अजून एक व्यक्ती आली आहे त्यांनी असं सांगितले की, त्यांच्याकडून 50 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नायजेरियन व्यक्तीला अडकवले गेले. मी बहीण, पत्नी, वडील यांच्याबद्दल कधीच द्वेष ठेवत नाही. जर हा जन्म दाखला खोटा असेल तर खरा जन्म दाखला दाखवा. वानखेडेंनी धर्मपरिवर्तन केलं नाही तर खरा दाखला समोर आणावा. माझ्याकडे अजूनही काही कागदपत्रे आहेत ती हळू हळू बाहेर काढेन. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. माझे प्रश्न समीर वानखेडे यांच्या बाबतीत आहे. क्रांती रेडकर बाबात मला जास्त खोलात जायचे नाहीये. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी समोर आणाव्या लागत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले. बेकायदा फोन टॅपिंग समीर वानखेडे यांनी कोणत्या कारणास्तव माझ्या मुलीचा सीडीआर मागितला आहे? वानखेडे स्वत:च्या सीमा पार करत आहेत. समीर वानखेडे फोन टॅप करत आहेत एक मुंबईत आणि ठाण्यातून फोन टॅप केला जात आहे. माझ्या मुलीचा सीडीआर मुंबई पोलिसांकडे मागितला… पण तो पोलिसांनी दिला नाही. आता ही लढाई सुरू राहील. कोणत्या अधिकारात वानखेडे माझ्या मुलीची खासगी माहिती मागत आहेत? एनसीबी डिपार्टमेंटला नवाब मलिकचा फोबीया झालाय का ? आमची लढाई एनसीबी संस्थेशी नाहीये. मिस्टर दाऊन वानखेडे माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोका मी तुम्हाला आव्हान देतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं.