JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ'; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ'; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Rajya Sabha election result: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांचे निकाल रात्री उशीरा जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबीपछाड देत धनंजय महाडिक यांना विजयी केलं.

जाहिरात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ'; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी (Rajya Sabha Election result) शुक्रवारी (10 जून) निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणी (Rajya Sabha Election counting) होणार होती. पण भाजपने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन मतांवर आक्षेप घेत त्यांची मते बाद करण्याची मागणी केली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election commission) हे प्रकरण गेलं आणि तब्बल 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर मतमोजणी सुरू होत पहिला निकाल हाती आला. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबीपछाड दिल्याचं पहायला मिळालं आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ’ पहायला मिळाला. नेमकं काय-काय घडलं? भाजपकडून जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचे सर्व आक्षेप फेटाळले. तर दुसरीकडे काँग्रेसने भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आक्षेपाबाबत पत्र पाठवलं. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिवसेनेने सुद्धा आपला आक्षेप नोंदवत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं. वाचा :  Rajya Sabha Election: धनंजय महाडिकांनी अखेर मैदान मारलं; वडिलांच्या विजयानंतर मुलगा भावूक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांची ऑनलाईन बैठक सुरू झाली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडी, भाजप यांच्यासोबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला एक वेगळं पत्र पाठवलं. 10.15 वाजता केद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुहास कांदे यांचं मत निवडणूक आयोगाने बाद ठरवलं. मध्यरात्री 1.50 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली मध्यरात्री 3 वाजून 7 मिनिटांच्या आसपास निवडणूक आयोगाने संजय राऊत, इम्रान प्रतापगढी, प्रफुल्ल पटेल, अनिल बोंडे, पियूष गोयल यांना विजयी घोषित केलं. रात्री 3 वाजून 47 मिनिटांनी धनंजय महाडिक विजयी झाल्याचं घोषित केलं. महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे हा गेम नेमका कसा झाला ते पाहूया. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं संजय राऊत- 41 प्रफुल्ल पटेल- 43 -2 ईम्रान प्रतापगडी- 44 - 3 संजय पवार- 33 वाचा :  फडणवीसांची खेळी यशस्वी, अपक्षांची मतं फुटली; महाविकास आघाडीला धक्का भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मतं अनिल बोंडे- 48 पियुष गोयल- 48 धनंजय महाडिक 27 मतांचे समीकरण संजय पवार यांना मिळालेली मतं 33+2 = 34 संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली. धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं 27+7+7 = 41 धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या