JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / rajya sabha election : मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, आमदारांना घेऊन लक्झरी बसेस रवाना

rajya sabha election : मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, आमदारांना घेऊन लक्झरी बसेस रवाना

जवळपास 80 टक्के आमदार आज दाखल झाले आहे. 2019 च्या सत्ता स्थापन कालावधीत, याच रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं.

जाहिरात

जवळपास 80 टक्के आमदार आज दाखल झाले आहे. 2019 च्या सत्ता स्थापन कालावधीत, याच रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जून :  राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) आता हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठापनाला लागली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं (shivsena) आता तिसऱ्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती.या बैठकीनंतर आता आमदारांना हॉटेलमध्ये बसेसने नेण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेली वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार, शिवसेना समर्थक लहान पक्ष आणि अपक्ष आमदार हजर होते.. विशेष म्हणजे, नाराज आमदार आशिष जयस्वाल वर्षावर पोहोचले.  मविआ मंत्र्यांवर जयस्वाल यांनी टक्केवारी आणी घोडेबाजार यावर टिप्पणी केली होती. त्यामुळे एकच  खळबळ माजली होती. आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे वर्षावर खास लक्ष दिल्याची माहिती आहे.  त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सेना वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली.  कोणत्या कामांबाबत ते नाराज असल्याची माहितीही मागितली. तर,  मेळघाटचे अपक्ष आमदार वर्षावर दाखल झाले आहे. वर्षावर सेनेचे जवळपास 35 ते 40 आणि 1 अपक्ष असल्याची माहिती आहे. आता या आमदारांसाठी  2 लक्झरी बसेल मागवण्यात आल्या. या आमदारांना मालाडला नेण्यात येणार आहे.  98 प्रवासी क्षमता या 2 बसेसची आहे. श्री गाला ट्रॅव्हल्सच्या या बसेस आहेत. या आमदारांना  मालाडच्या मारवे मढावर हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र,मराठवाड्यातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर येणार आहे.  जवळपास 80 टक्के आमदार आज दाखल झाले आहे. 2019 च्या सत्ता स्थापन कालावधीत, याच रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणक मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं ही रणनिती आखली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या