JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : संभाजीराजे मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

BREAKING : संभाजीराजे मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

सेनेकडे उमेदवाराची अधिकृत घोषणेची तयारी सुरू आहे. आता संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहे.

जाहिरात

सेनेकडे उमेदवाराची अधिकृत घोषणेची तयारी सुरू आहे. आता संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे : राज्यसभेच्या (rajya sabha election 2022) सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी मिळणार अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. मात्र, छत्रपती संभाजीराजे  (Sambhaji Raje) यांच्या नावावरून अजूनही सस्पेन्स अजूनही कायम आहे. संभाजीराजे मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून त्यांना ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर आता सेनेकडे उमेदवाराची अधिकृत घोषणेची तयारी सुरू आहे. आता संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहे. कोल्हापूरमधून संभाजीराजे मुंबईत पोहोचले आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही संघटना संभाजीराजे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर संभाजीराजे हे पुढील रणनीती ठरवणावर आहे. पण, त्यांना अजूनही शिवसेनेनं पाठिंबा द्यावी, अशी अपेक्षा आहे. दरम्यान,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये आज सकाळी फोन वरून सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप समर्थक मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून संभाजीराजे यांच्यावर शिवसेनेत जाण्यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. काही संघटनांनी यासाठी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. ( सई लोकूरचं नवऱ्यासोबत रोमॅंटिक फोटोशूट; पैठणीचा घागरा अन् जॅकेटनं दिला हटके लुक ) संभाजीराजे मुंबईत यायला निघाले आहेत. मात्र आज संध्याकाळ पर्यंत येईपर्यंत त्यांचं मत बदललं तर शिवसेना कोल्हापूरचेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवारी घोषित करणार असल्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी फाईल केली बंद तर दुसरीकडे, ‘सहावा उमेदवारच कुठे आहे, संजय पवार यांचं नाव फायनल झाले आहे. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार आहे. पवार हा कोल्हापूरचा मावळा आहे, मावळे असता म्हणून राजे असतात, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ( भारतीय क्रिकेटरचा कूल अंदाज… पॅरिसमध्ये फॅमिलीसोबत साजरी करतोय सुट्टी PHOTOS ) शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे.  संभाजीराजे यांचा आम्ही आदर ठेवतो, त्यांच्या कुटुंब आणि गादीविषयी कायम आदर ठेवत असतो. सहाव्या जागेसाठी तुम्ही उमेदवार व्हा, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते मैदानात आले आहे, जर कुणाकडे 42 संख्याबळ असेल त्यांनी पाठिंबा द्यावा. संभाजीराजे यांचा विचार करून शिवसेनेनं ऑफर दिली होती. शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असा आम्ही प्रस्ताव दिला होता, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या