JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / rajya sabha election 2022 : पुणे-मुंबई-पुणे, भाजपच्या आजारी आमदाराला एअर लिफ्ट करणार?

rajya sabha election 2022 : पुणे-मुंबई-पुणे, भाजपच्या आजारी आमदाराला एअर लिफ्ट करणार?

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मुंबईला नेणार कसं नेणार असा मोठा प्रश्न भाजप नेत्यांसमोर उभा ठाकला आहे.

जाहिरात

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मुंबईला नेणार कसं नेणार असा मोठा प्रश्न भाजप नेत्यांसमोर उभा ठाकला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 09 जून : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. पण, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (bjp mla laxman jagtap) आजारी आहे. त्यामुळे त्यांना एअर लिफ्ट करून आणणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी 10 जून रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपचे सर्व आमदार मुंबईत पोहोचले आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघांचे  आमदार लक्ष्मण जगताप यांना मुंबईला नेणार कसं नेणार असा मोठा प्रश्न भाजप नेत्यांसमोर उभा ठाकला आहे.  कारण,  आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे ते मतदानाला येतील का आले तरी मतदान करू शकतील का असा प्रश्न आहे. दोनच दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून जगताप यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापूर्वी ते 50 दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते.  त्यामुळे जगताप राज्यसभेच्या मतदानाला जाणार का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. दरम्यान, आमदार जगताप यांना हेलिकॉप्टरने मुंबईला नेण्यात येईल, अशी चर्चा रंगली आहे.  पण आमदार जगताप यांच्या कुटुंबीयांनी एअर लिफ्ट करण्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. भाजपचे वरिष्ठ नेते किंवा प्रदेशाध्यक्ष सांगू शकतील, अशी माहिती दिली. दरम्यान, मुंबईमध्ये भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते.  देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत आमदारांना स्पष्ट सूचना दिली. मतदानादरम्यान पक्षाकडून सांगितलं जाईल तेवढंच करा, राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या