JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची धाकधूक का वाढली? आठ तटस्थ आमदारांभोवती महाराष्ट्राचं राजकारण

राज्यसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची धाकधूक का वाढली? आठ तटस्थ आमदारांभोवती महाराष्ट्राचं राजकारण

भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जून : राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची (Maharashtra Government) धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवाराने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते पहिली मोजली जातील. ( महाविकास आघाडीची तज्ज्ञांची कमिटी तयार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती ठरली ) एकीकडे 42 मतांचा कोटाही गाठायचाय आणि दुसरीकडं दुसऱ्या पसंतीची मते आपल्याच उमेदवाराची मोजली जावीत, याकरता अगोदरच्या उमेदवारांना 42 पेक्षा जास्त मतेही द्यायची आहेत. म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीला अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, सध्या तरी भाजप आणि शिवसेनेची सारी मदार ही तटस्थ असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर असणार आहे. भाजपच्या पाठिशी कोण? भाजपचे १०६ आमदार भाजपला पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष आमदार - ७ १. रासपचे राहूल कूल २. जनसुराज्यचे विनय कोरे ३. रवी राणा ४. प्रकाश आवाडे ५. राजेंद्र राऊत ६. रत्नाकर गुट्टे ७. महेश बालदी,उरण एकूण - ११३ आमदार भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असल्यानं येणार नाहीत. त्यामुळं भाजपची मतं ११२ होतील. दोन उमेदवारांना ८४ मते दिल्यानंतर २८ मते शिल्लक राहतात. धनंजय महाडिकांना विजयासाठी पहिल्या पसंतीची आणखी १४ मतांची गरज पडणार आहे. भाजप धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्यासाठी मोठा घोडेबाजार करणार हे आता उघड झालंय. तसे संकेतही भाजपच्या नेत्यांनी दिलेत. महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी १) शिवसेना - ५५ २) राष्ट्रवादी काँग्रेस - ५३ ३) काँग्रेस - ४४ ४) सपा - २ ५) प्रहार - २ ६) स्वाभिमानी शेतकरी - १ मविआ समर्थक इतर आमदार अपक्ष आमदार संख्या - ९ १. शंकरराव गडाख, अहमद नगर २. राजेंद्र पाटील-येड्रावकर, कोल्हापूर ३. मंजुषा गावित, धुळे ४. गिता जैन, मीरा-भाईंदर ५. आशिष जयस्वाल, रामटेक ६. किशोर जोरगेवार, चंद्रपूर ७. चंद्रकांत पाटील, जळगाव ८. विनोद अगरवाल, गोंदिया ९. संजय शिंदे, करमाळा एकूण १६६ आमदार (नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्यास परवानगी न दिल्यास १६४) १६४ आकडा धरल्यास ३ उमेदवारांना प्रत्येकी ४२ मते दिल्यानंतरही महाविकास आघाडीकडे ३८ मते शिल्लक राहतात. म्हणजे विजयासाठी ३ मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या तटस्थ असणाऱ्या ८ आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. तटस्थ लहान पक्ष आणि आमदार १) बहुजन विकास आघाडी - ३ २) शेकाप - १ ३) एमआयएम - २ ४) माकप - १ ५) मनसे - १ तटस्थ आमदार संख्या एकूण - ८

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या