JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राजू शेट्टी यांची 'स्वाभिमानी' निवडणूक लढवणार, एवढ्या जागांवर केला दावा

राजू शेट्टी यांची 'स्वाभिमानी' निवडणूक लढवणार, एवढ्या जागांवर केला दावा

स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,28 सप्टेंबर: स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहेत. भाजप, शिवसेनेच्या विरोधात महाआघाडीचा एक घटक म्हणून ही निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. राजू शेट्टी यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 50 जागाचा दावा केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने 38 जागांचा आम्हाला प्रस्ताव दिला आहे. पण आम्ही आणि इतर छोटे पक्ष मिळून 50 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. जालिंदर पाटलांची हंगामी नेमणूक.. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यश रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे. त्या जागेवर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील यांची प्रदेशाध्यशपदी हंगामी नेमणूक करण्यात आली आहे. रविकांत तुपकरांनी सोडली राजू शेट्टींची साथ दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रविकांत तुपकर हे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जात होते. ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा’ असा राजीनामा रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींकडे सोपवला. रविकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, रविकांत तुपकर यांनी शनिवारी मुंबई येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन रयत क्रांती संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे. ‘वंचित’मधून बाहेर पडणार हा नेता.. वंचित बहुजन आघाडीतून एमाआयएम बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना एक मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपिचंद पडळकर यांनी राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या