मुंबई, 30 एप्रिल: देशभरात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination of 18 to 44 years citizens) सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. मात्र, राज्यात लसींचा तुटवडा (Vaccination shortage in Maharashtra) निर्माण झाल्याने 1 मे पासून लसीकरण करणं शक्य नसल्याचं दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. आज पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, केंद्र सरकार ने लसीकरण केलेला कार्यक्रम 45 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी आहे. केंद्र सरकार जशा सूचना देईल तसच करण्यात येईल. खाजगी रुग्णालयाचा डोस पूर्ण करावा लागेल किंवा तो रेकॉर्ड सरकारकडे घेऊन ते लसीकरण सरकारला घ्यावं लागेल. एक दिवसात आमची सात लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे तेवढा पुरवठा केंद्र सरकार करणार आहे का? महाराष्ट्र दिनी लसीकरण सुरू करण्यास मुख्यमंत्री आग्रही 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, याच दिवशी लसीकरण मोहिमेला सुरुवात व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्यानुसार लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आम्हाला आज रात्री सूचना देतील, तसचे जनतेशी संवाद साधतील असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. Covid Vaccination: केवळ 2 दिवसात 2.45 कोटी जणांचं रजिस्ट्रेशन, मात्र अनेक राज्यांत लसीचा तुटवडा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या भूमिकेवर सवाल राज्यांच्या क्षमतेनुसार आम्ही पुरवठा करत असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले होते, मात्र, प्रत्यक्षात लसींचा तितका साठा उपलब्ध होतच नसल्याचं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यातील कोरोनाची स्थिती आणि वाढवलेला लॉकडाऊनचा कालावधी यावरही मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे.