JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मनसेनंही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला; राज यांच्या खेळीने मुख्यमंत्र्यांना बळ मिळणार?

मनसेनंही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला; राज यांच्या खेळीने मुख्यमंत्र्यांना बळ मिळणार?

मनपा निवडणुकीकरता ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा आणि मनसे अशी युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

जाहिरात

मनसे ठाण्यातून पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकणार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 11 फेब्रुवारी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाण्याला राजकीय दृष्टीने महत्व प्राप्त झालं आहे. अनेक राजकीय पक्षांनी ठाण्यात मोठे कार्यक्रम घेण्यावर भर दिला आहे. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनेही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे. मनसेचा वर्धापन यंदा ठाण्यात होणार आहे. “संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी, अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियातून व्हायरल करण्यात येत आहे. मनसे ठाण्यातून पालिका निवडणूकांचे रणशिंग फुंकणार? मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड केल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आहे. मनसेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन ठाण्यात घेणार आहे. शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासुन सर्वच पक्षांनी आपले महत्वाचे पक्षीय कार्यक्रम ठाण्यात घेण्यावर जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षांनी पक्षाच्या प्रमुख सभा तसच मोर्चे आणि आंदोलनाची सुरुवात ठाण्यातूनच केली. वाचा - …म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कारने पोहोचले, पंकजा मुंडेंचा खुलासा मनसेच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात मिळणार आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. ठाणे मनपामध्ये पालिका निवडणुकीत नगरसेवक येतील, अशा मनसेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मनपा निवडणुकीकरता ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे अशी युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मनसे-शिंदे गट युती होईल? गेले काही दिवस ज्या वेगानं हालचाली होत आहेत आणि त्यासाठी गाठीभेटी होत आहेत, ते पाहता एकेकाळचे शिवसेनेतले हे दोन नेते आता त्या शिवसेनेबाहेर एकत्र येतील अशी शक्यता दाट आहे. गणेशोत्सवात अगोदर शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दर्शनासाठी जाणं आणि लगेचच राज यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणं ही ‘दर्शन डिप्लोमसी’ नवी युती तयार होण्याचंच लक्षण आहे, हे स्पष्ट आहे. या दोघांमधला दुवा आहे भाजपा. शिंदेंचं बंड होण्याच्या कैक महिने अगोदर भाजप आणि मनसे यांची युती होणार असं म्हटलं जाऊ लागलं होतं. 2019 ला शिवसेनेच्या ‘महाविकास आघाडी’ प्रयोगानंतर भाजपशी दुसऱ्या ठाकरेंशी जवळीक वाढली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या