Representative Image
मुंबई, 4 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. थंडी आणि पाऊस असे दोन्ही एकत्र अनुभव आले आहेत. तर इस्टर्न एक्सप्रेसवेवर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. थंडीची चाहूल लागतात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत अधिक गारवा निर्माण झाला आहे. पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस होऊ शकतो.
हे वाचा- VIDEO : रानगव्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीचंही दर्शन; शेतकरी धास्तावला उत्तर भारतात एकीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. तापमानाचा पारा 1 आणि 2 डिग्रीपर्यंत खाली उतरत असताना शनिवारी आणि रविवारी रात्री काही भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली होती. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती. वातावरणातील बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होईल अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात 6 आणि 7 जानेवारीला रिमझिम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर राज्यात काही ठिकाणी ढगाळ तर विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत 19 ते 21 अंश सेल्सियस तापमान असून येत्या आठवड्यात दोन ते तीन डिग्रीनं आणखीन खाली उतरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.