महाड, 24 जुलै : मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) पूराने थैमान घातलेल्या रायगड जिल्ह्यात दुर्घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. महाड जवळील तळीये गावात दरड कोसळून (Landslide) अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. हिरकणी गावाजवळ (Hirkani Village) घडलेल्या या दुर्घटनेचा LIVE VIDEO आता समोर आला आहे. (Landslide Live Video) महाड तालुक्याला दरडींचा मोठा धोका जाणवत असताना रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाजवळ सकाळच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळून झालेली ही दुर्घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भीषण आहे याचा अंदाज आपल्याला वर्तवता येऊ शकतो.
Maharashtra Flood: ‘…म्हणून लगेच पूरग्रस्त भागाचा दौरा करत नाही’ अजित पवारांनी सांगितलं कारण दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे हिरकणी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने महाडमधील पूरग्रस्त भागातील पाणी आता ओसरले आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्यापही चिंता कायम आहे. तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना महाड तालुक्यातील तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा हेलिकॉप्टरने तळीये गावाकडे रवाना झाले असून ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.