JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / प्रताप सरनाईकांनी शिवसेनेलाच लावला सुरुंग, 18 नगरसेवक घेऊन शिंदे गटात दाखल

प्रताप सरनाईकांनी शिवसेनेलाच लावला सुरुंग, 18 नगरसेवक घेऊन शिंदे गटात दाखल

प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहे.

जाहिरात

प्रताप सरनाईकांनी शिवसेनेलाच लावला सुरुंग, 18 नगरसेवक घेऊन शिंदे गटात दाखल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. आमदारांपाठोपाठ खासदार आणि नगरसेवकांचं शिंदे गटामध्ये अजूनही इन्कमिंग सुरूच आहे. आता शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहे. एकनाथ शिंदे गटामध्ये आमदारांपाठोपाठ आता ठाणे, मुंबई आणि इतर भागांमधून शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची इन्कमिंग सुरूच आहे. आज मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होणार आहे. मीरा भाईंदर शहरात गेल्या १३ वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात आणि पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान १८ शिवसेना नगरसेवक, तसंच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत. यावेळी हे नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हॅाटेल लिलीमध्ये सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. ईडीने सरनाईक यांची संपत्तीही जप्त केली होती. त्यानंतर सरनाईक यांनी भाजपसोबत युती करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारले होते, त्यावेळी प्रताप सरनाईक हे शिंदे गटात सामील झाले होते. शिंदे यांच्यासोबत सरनाईक सुरतमध्ये हजर होते. आता शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचेच नगरसेवक फोडले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या