मुंबई, 28 जून: कोरोना विषाणूचा उद्भाव (Corona pandemic) झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र (Education sector) पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) अवलंब केला जात आहे. अशातच मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाचे ऑनलाइन क्लास सुरू असताना मध्येच पॉर्न व्हिडीओ (Porn video shared in online class) लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनानं गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयात घडली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हे महाविद्यालय ऑनलाइन वर्ग घेत आहेत. दरम्यान काल एका अज्ञात युवकानं ऑनलाइन क्लासची यंत्रणा हॅक करत हे खोडसाळ कृत्य केलं आहे. या क्लाससाठी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये बऱ्याच मुलीदेखील होत्या. या घटनेनं महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महाविद्यालयानं जुहू पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये घुसून मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ दुसऱ्या एका घटनेत, एका युवकानं लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये (Online class) घुसखोरी करत एका अल्पवयीन मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ (Abuse) केल्याची संतापजनक घटनाही समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. ही घटना मीरा रोड येथील एका शाळेत घडली आहे. हेही वाचा- शिक्षणासाठी मावशीकडे आली अन् घडलं विपरीत; मामा आणि काकानंच केले 7 महिने अत्याचार ऑनलाइन वर्ग सुरू असताना आरोपींनं लिंकद्वारे क्लासमध्ये घुसखोरी करत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची छळवणूक केली आहे. सर्वांसमोर तिला लज्जास्पद वाटेल, अशा शब्दांत आरोपीनं शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.