JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत उद्यापासून शाळा सुरू करण्याचे निर्देश, पालकवर्गात संभ्रम कायम; पुण्यात काय स्थिती?

मुंबईत उद्यापासून शाळा सुरू करण्याचे निर्देश, पालकवर्गात संभ्रम कायम; पुण्यात काय स्थिती?

School Reopen in Mumbai: 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मात्र शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात न आल्याने पालकवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.

जाहिरात

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर: गेल्या जवळपास दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पण आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर, राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून पाऊलं उचलली जात आहेत. 1 डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण शहरातील शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर आता शहरातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय महापालिकेने 30 नोव्हेंबर रोजीच घेतला होता. 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. त्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावली देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस बाकी असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात न आल्याने पालकवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. पण शाळा सुरू करण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आला नसून 15 डिसेंबरपासूनच शाळा सुरू होतील असं तडवी यांनी सांगितलं आहे. हेही वाचा- 35 पैशांचा शेअर पोहोचला 200 रुपयांवर! 3 वर्षात 1 लाखाचे बनले 5 कोटींपेक्षाही जास दुसरीकडे, औरंगाबाद शहरातील देखील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे. 20 डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे मार्च 2020 पासून घरात बसून असलेले विद्यार्थी 20 महिन्यानंतर शाळेत जाणार आहेत. हेही वाचा- महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना विशेष म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार शाळा भरेल तर शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल, अशी माहिती शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली आहे. शनिवारी शहरातील सर्व शाळांची साफसफाई केली जाईल, असंही थोरे यांनी सांगितलं आहे. हेही वाचा- अपहरण आणि गँगरेपची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड याशिवाय पुण्यातील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत आज महापालिका आयुक्त आणि महापौर पालकमंत्री अजित पवार यांच्याशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेणार आहेत. उद्यापासून पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. आज सायंकाळपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या