JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'कुणीही शहाणपणा करू नये', राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कडक शब्दांत आदेश

'कुणीही शहाणपणा करू नये', राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कडक शब्दांत आदेश

’ ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेते भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे,'

जाहिरात

' ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेते भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे,'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरू केली आहे. पण, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदाराने राज ठाकरेंना थेट आव्हान दिल्यामुळे वाद पेटला आहे. त्यामुळेच कुणी याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (mns workers) आदेश दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन नुकताची मोहिम पार पडली. त्यानंतर आता जून महिन्यात राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची जोरात तयारी सुरू आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना सकाळीच कुणीशी न बोलण्याचे आदेश दिले होते. आता खुद्द राज ठाकरेंनी आदेश काढला आहे.

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलती. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसंच इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेते भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असा आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये काढला आहे. दरम्यान, आज दुपारीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाद्वारे (Social Media) एक विशेष संदेश जारी केला आहे. या संदेशातून त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्याचे पालन न केल्यास गंभीर दखल घेतली जाईल, अशी तंबी मनसैकांना दिली आहे.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्ते करीत असतात. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रसारमाध्यमांसमोर राजकीय भूमिकांबाबत भाष्य करु नये”, असं आवाहन नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.त्यामुळे आता मनसैनिक आपल्या पक्षश्रेष्ठींचं कितपत ऐकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या