JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / '...म्हणून पुढच्या वेळेस चड्डीत राहायचं'; शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरुन राणे सुपूत्र आक्रमक

'...म्हणून पुढच्या वेळेस चड्डीत राहायचं'; शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरुन राणे सुपूत्र आक्रमक

नारायण राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ गोमूळ आणि दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑगस्ट : भाजपने आयोजित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे. नारायण राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ गोमूळ आणि दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर आता नितेश राणे यांनी आपल्या शैलीत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला बोल करण्यास सुरुवात केली आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करीत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अडवण्याची भाषा करणारे आता गोमूत्रावर आले, म्हणून पुढच्या वेळ चड्डीत राहायचं. आता नितेश राणे यांच्या ट्विटनंतर शिवसैनिक काही गप्प बसणार नाही हे तर नक्की. त्यामुळे शुक्रवारी यावर अनेक शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. आज राजकीय वर्तुळात शुद्धीकरणाचा विषय चर्चेत होता. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही जहरी टीका केली आहे.

हे ही वाचा- महाराष्ट्रातील परिस्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही’; सदाभाऊ खोतांची जहरी टीका राणे विरुद्ध शिवसेना मुंबईत शिवसेनेची सत्ता उलथून टाकून यावेळी भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला. त्यापूर्वी त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना होती. शिवसेनाप्रमुखांना धोका देणाऱ्या राणेंना शिवतीर्थावर प्रवेश देणार नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली होती. नारायण राणेंच्या शिवाजी पार्क भेटीनंतर आता शिवसैनिकांनी त्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करत असल्याचं सांगत भाजपला एकप्रकारे खिजवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या