मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्याशी संबंधित कथित चॅटचे स्क्रिनशॉट (chat screenshot) शेअर केले होते. मलिकांच्या या ट्विटनंतर क्रांती रेडकर यांनी मुंबई पोलिसात (Mumbai Police) ऑनलाईन तक्रार केली आहे. या तक्रारीत क्रांती यांनी नवाब मलिकांनी खऱ्या-खोट्याची पडताळणी न करता चुकीचे ट्विट केले. त्यामुळे या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी क्रांती यांनी केली आहे.
नवाब मलिकांच्या ट्विटमध्ये क्रांती रेडकर यांच्याशी संबंधित एक चॅटचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. त्या चॅटमध्ये समोरची व्यक्ती ही क्रांती मॅडम माझ्याकडे दाऊद आणि नवाब यांच्या कनेक्शनचे पुरावे आहेत. प्लीज मला मेसेज करा. त्यावर क्रांती यांनी तुमच्याकडे नेमके काय पुरावे आहेत? असा प्रश्न विचारला. तर समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा एकत्र फोटो असल्याचा दावा केला. त्यानंतर क्रांती यांनी प्लीज तो फोटो पाठवा. तुम्हाला बक्षिस देऊ, असा मेसेज केल्याचा दावा स्क्रिनशॉटमध्ये करण्यात आला आहे.हेही वाचा : ST Bus Strike : अनिल परबांच्या ऑफरनंतर पडळकरांनी घेतली नरमाईची भूमिका, म्हणाले..
नवाब मलिकांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉटवर क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं. “संबंधित फोटो चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. मलिकांनी शेअर केलेले स्क्रिनशॉट पूर्णपणे खोटे आहेत. माझी कुणासोबतही बातचित झालेली नाही. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा कोणतीही पडताळणी किंवा शाहनिशा न करता शेअर केलं आहे. हे मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशांच्या विरोधात आहे. मी याप्रकरणी मुंबई सायबर क्राईमकडे तक्रार करत आहे. मला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांना आवाहन करु इच्छिते, चिंता करु नका. ही आपली भाषा आणि संस्कृती नाही”, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिलीय.
हेही वाचा : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि..’ मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात विकते मसाले आता या प्रकरणी पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे क्रांती यांना सोशल मीडियावर अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. कथित स्क्रिनशॉट प्रकरणी क्रांती यांना अनेकांनी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली होती.