मुंबई, 13 जून : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) सर्व काही आलबेल असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या आणि विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या वक्तव्यांवरून मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यात नाना पटोले यांच्या एका ताज्या वक्तव्यावरून आता नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाना पटोले यांच्या वक्त्यव्यातून थेट मुंख्यमंत्रीपद मिळवण्याची इच्छा दिसून आल्यानं आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहे. (वाचा- पेरणी करण्यापूर्वी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केलं ‘हे’ आवाहन ) नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये अकोल्यात मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांचं मोदींनी मन की बात मधून कौतुक केलं होतं. त्यामुळं या पक्ष प्रवेशाला वेगळं वलय प्राप्त झालं. पण राऊत यांनी यावेळी आणखी एका नव्या विषयाला सुरुवात करून दिली. मुरलीधर राऊत यांनी यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे आपल्या नेत्यांबाबत इतर नेते वक्तव्य करत असतात. पण नाना पटोले यांनीह स्वतःदेखिल तीच म्हणजे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (वाचा- ऐकावं ते नवलंच! रुग्णाच्या मेंदूतून निघालं चेंडूच्या आकाराएवढं Black Fungus ) नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर इतर पक्षांच्या प्रतिक्रिया येणं तर साहजिकच आहे. पण काँग्रेसमधून त्यांना काय प्रतिक्रिया मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. त्यात काँग्रेसचे दुसरे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आले. विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, असं उत्तर पत्रकारांना दिलं. पण हा मुद्दा खरंच असा एका ओळीत संपणारा आहे का हाही विषय महत्त्वाचा आहेत. काँग्रेसमधील अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियांकडंही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपच्या हाती तर यानंतर आयती संधी चालून आली आहे. राज्यातील सरकारमध्ये वाद असल्याचं दाखवून देण्यासाठी त्यांना आणखी एक मुद्दा हाती लागला आहे. त्यानुसार भाजपच्या अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर अशा नेत्यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातही सध्या शाब्दीक चकमक सुरू आहे. शिवसेनेतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे, की उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार. पण आता राज्याच्या राजकारणात उठलेलं हे वादळ नेमकं कुणाला घेऊन उडणार हे लवकरत स्पष्ट होणार आहे.