JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुनगंटीवारांना लगेच पहाट आठवते, अजित पवारांच्या टोलेबाजीने सभागृहात एकच हश्या

मुनगंटीवारांना लगेच पहाट आठवते, अजित पवारांच्या टोलेबाजीने सभागृहात एकच हश्या

मुनगंटीवार यांना पहाट आठवायला लागते. आता काय करायचं मुळात तेव्हा सकाळचे 8 वाजले होते.

जाहिरात

आमदारांना 5 कोटींचा निधी जाहीर केला आहे. एवढंच नाहीतर आमदारांचे सचिव आणि ड्रायव्हरला सुद्धा पगारवाढ जाहीर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 डिसेंबर : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचा पहाटे शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज  हिवाळी अधिवेशनात (winter season maharashtra 2021) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो पहाटेचा शपथविधी सोहळा नव्हता तर सकाळचा होता, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनंगटीवार (sudhir mungantiwar) यांना टोला लगावला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात निवेदन सादर केले. यावेळी राज्यातील परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेचा शपथविधी सोहळा याची आठवण करून दिली. अजित पवार यांनी मग आपल्या शैलीत याला उत्तर दिले. ‘मी एकट्याच नाव नाही घेत, सगळ्यांची नाव घेतो. नाहीतर म्हणशाल काय एकट्याचं नाव घेतात. असं काही मनात आणू नका नाहीतर लगेच मुनगंटीवार यांना पहाट आठवायला लागते. आता काय करायचं मुळात तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. मुनगंटीवार हे सकाळच्या 8 वाजेला पहाट म्हणतात. पहाट पहाट बोलताय, आता काय करायचं? आम्ही रात्री सुद्धा झोपतो,  असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हश्श्या पिकली. दरम्यान, जाणीवपूर्वक उगाच प्रचार करतात की आम्ही पश्चिम  महाराष्ट्राची बाजू घेतो आताही विदर्भाला 2021-22 साठी 26% निधी देतो, लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. महामंडळाच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. आम्ही सगळ्याच भागातले मंत्री जरी असलो तरी राज्य म्हणून विचार करतो. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वत नसलं तरी कुणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही अजितदादांनी दिली. पेट्रोलचे दर कमी केले का नाही? ‘राज्य सरकारने टॅक्स कमी केला नाही हे मी मान्य करतो. जिथे भाजपचे सरकार आहे तिथे वरून आदेश आला तिथे टॅक्स कमी केला. मी मान्य करतो 25 राज्यांनी टॅक्स कमी केला. 5 आणि 10 रुपये कमी केल्यानंतर राज्य सरकारला व्हॅट मिळायचा तो महिन्याला 250 कोटी रुपये कमी झाला. त्यामुळे 3000 कोटी रुपये उत्पन्न कमी झाले असते, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ‘पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा विमा कंपन्यांनाच’ ‘पीक विमा इतका उतरवतो पण पैसे का मिळत नाही. पिकाचं नुकसान झालं तर पैसे मिळतील.  844 कोटी रुपये 12 लाख शेतकऱ्यांना वाटप झाले आहेत. पालघरच्या चिकू या फळांच्या 1 लाख  रुपये विम्यासाठी 85 हजार रुपये द्यावे लागतात तर केळीला 40 हजार आणि आंबा 60 हजार रुपये द्यावे लागतात. पीक विमा प्रकरण आता हायकोर्टात आहे. नैसर्गिक नुकसान झालं तरी विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा विमा कंपन्यांना होतो, असंही अजित पवार म्हणाले. ‘एसटी महामंडळाचे विलीनीकरण होणार नाही’ प्रत्येकाने विलीनीकरणाचा हट्ट केला तर हे शक्य नाही. पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की. पगाराची हमी आम्ही घेतली आहे. 10 तारखेच्या आत पगार मिळणार आहे. कॉलेज सुरू झालंय, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असं म्हणत अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला. ‘यापुढच्या परीक्षा TCS मार्फत’ टीईटी परीक्षा घोटाळा हा mp च्या व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे, पुणे पोलीस या पूर्ण रॅकेट उध्वस्त करणार आहे. आरोग्य विभागातील क गटाच्या भरतीत घोटाळा नाही पण ड विभागाच्या परीक्षेत झाला आहे. शंका उपस्थित होताच म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आली. यापुढच्या परीक्षा tcs, ibps, MKCL यांच्या मार्फत घेतल्या जातील, पोलीस भरती पारदर्शकपणे करू, अशी घोषणा अजितदादांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या