JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Road Development : मुंबईकरांना खास भेट, तब्बल 7 किमीचा सी फेस लवकरच सज्ज

Mumbai Road Development : मुंबईकरांना खास भेट, तब्बल 7 किमीचा सी फेस लवकरच सज्ज

धावपटू, सायकलपटू तसेच मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना या 7 किमीच्या पट्ट्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : मागच्या काही काळापासून मुंबईत कोस्टल रोडचे काम सुरू आहे. यामुळे वरळी सी फेस, मरीन ड्राइव्ह तसेच हाजीअली या भागातील समुद्र किनारा वरळीपासून ते थेट मलबार हिलपर्यंत सुमारे सात किलोमीटर बंद आहे. परंतु या भागात मुंबईकरांच्या आनंदाचे काम सुरू आहे. या सात किलोमिटर भागात नवा सी फेस मुंबईकरांना लाभणार आहे. यामुळे धावपटू, सायकलपटू तसेच मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना या 7 किमीच्या पट्ट्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

मुंबईत सध्या किनारे सुशोभिकरण करण्याच्या प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत 10.58 किमीचा हा कोस्टल रोड होत आहे. यादरम्यान जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पर्यटन उद्याने होणार आहेत. याचबरोबर किनाऱ्यांवर बसण्यासाठी विशेष बैठक व्यवस्थाही उभारण्यात येणार आहे.

Thane to Nashik : ठाणे ते नाशिक 150 किमीचा प्रवास आता तासाभरात, नागपुरलाही फायदा

संबंधित बातम्या

याचे कामही जोरात सुरू असून सध्या वरळी सी फेसपासून साधारण 100 किमी लांबीवर नवीन सी फेसच्या कामालाही वेग आला आहे. थेट समुद्राच्या कुशीत असलेला हा सी फेस येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून फेरफटका मारत अगदी चालत महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, प्रियदर्शनी पार्क यांना भेट देत थेट मलबार हिलपर्यंत जाणे शक्य होईल.

जाहिरात

मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्यांचे कामही जोरात सुरू आहे. हे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याने पुढच्या दोन महिन्यात याचे 100 टक्के काम होण्याची शक्यता आहे. एका बाजूचा बोगदा पूर्ण झाला असून दुसऱ्या बाजूकडील बोगद्याचे केवळ 100 मीटरचे काम राहिले आहे. या बोगद्यात सर्व अत्याधुनीक सुवीधा देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
मुंबईकरांसाठी चांगली बातमी! 50 मिनिटाचं अंतर अवघ्या 6 मिनिटात; नव्या पुलामुळे नागरिकांचा वेळ वाचणार!

कोस्टल रोडचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंते मंतय्या स्वामी यांनी दिली. काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. मात्र अंतर्गत सोयीसुविधा उभारण्यास आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या