JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Shocking! मुंबईत ICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; नातेवाईकांच्या आरोपाने एकच खळबळ

Shocking! मुंबईत ICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; नातेवाईकांच्या आरोपाने एकच खळबळ

Rats nibble eyes of patient in Rajawadi Hospital Mumbai: मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून: मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप (Allegation of rat nibble eyes of patient) करण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हा प्रकार घडला असल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सेनेचे नेते विजय शिवतारे हॉस्पिटलमध्ये, मुलीने भावांबद्दल लिहिली धक्कादायक FB पोस्ट डॉक्टरांनी काय म्हटलं? याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदरचा आयसीयू रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे. उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला असावा अशी शक्यता आहे. डॉक्टरांनीही शक्यता नाकारली नसल्याने पालिकेच्या रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर आयसीयू वॉर्डमध्ये असा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या