JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईचा रिअल सिंघम, स्वतःवर चाकूचा वार झेलत वाचवला तरुणीचा जीव; Live Video

मुंबईचा रिअल सिंघम, स्वतःवर चाकूचा वार झेलत वाचवला तरुणीचा जीव; Live Video

सुदैवानं मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला आहे. ही घटना मुंबईतल्या वडाळा (Barkat Ali Naka in Wadala) येथील बरकत अली नाका येथे घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मे: मुंबईत (Mumbai) भरदिवसा भररस्त्यात तरुणीवर झालेल्या चाकू हल्लाचा थरार पाहायला मिळाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवानं मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला आहे. ही घटना मुंबईतल्या वडाळा (Barkat Ali Naka in Wadala) येथील बरकत अली नाका येथे घडली आहे. ही घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणीच्या घरचे लग्न करण्यास परवानगी देत नाहीत म्हणून संतापलेल्या तरुणाने गंभीर पाऊल उचललं. त्यानं रागाच्या भरात तरुणीला भररस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. आरोपी तरुण धारदार चाकूनं तरुणीवर सपासप वार करणार तेवढ्यात पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांनी त्या माथेफिरू तरुणाला वेळीच अटकाव करून तरुणीचे प्राण वाचवले. मात्र यावेळी आरोपी तरुणानं केलेला एक वार पाटील यांच्या हातावर झाल्यानं ते देखील या हल्ल्यात जखमी झाले. राज ठाकरेंचा इशारा, मुंबईतल्या 26 मशिदींच्या मौलवींनी घेतला मोठा निर्णय काही सेकंदांचा हा खेळ घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी शिवडीच्या बरकत अली नाका येथे पायी जात होती. त्यावेळी 31 वर्षीय अनिल बाबर हा तिच्या पाठीमागून आला आणि तरुणीला रस्ता क्रॉस करत असताना त्याने सोबत आणलेल्या चाकूनं तिच्या पाठीवर वार केला. त्यावेळी तेथे तैनात असलेले वडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर पाटील यांनी तात्काळ धाव घेतली आणि अनिलला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी अनिलनं पाटील यांच्या हातावर सुद्धा वार केला. पण पोलिसांनी मोठ्या हिंमतीनं आरोपीला रोखलं आणि तरुणीचे प्राण वाचवले.

संबंधित बातम्या

त्यानंतर घडलेला प्रकार शिवडी पोलीस ठाण्यात समजला त्यानंतर तैनात असलेले अन्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अनिलला पकडलं आणि जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. काल सकाळी पावणे अकराच्या सुमारास बरकत अली नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला. रागात प्रेयसीवर हल्ला अनिल आणि अंकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे अनिलच्या कुटुंबीयांनी अंकिताच्या घरच्यांकडे लग्नासाठी मागणी केली होती. मात्र अंकिताच्या घरच्यांना अनिल पसंत नव्हता. त्यामुळे त्यांनी अनिलसोबतच्या लग्नास नकार दिला होता. त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झालेले होते. त्यातूनच ही घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या