JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : 13 वर्षाच्या चिमुरडीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधून ओळखते प्रत्येक गोष्ट, Video

Mumbai News : 13 वर्षाच्या चिमुरडीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधून ओळखते प्रत्येक गोष्ट, Video

अनेक मुलं लहान वयात वेगवेगळे विक्रम करतात. मुंबईतील एका 13 वर्षांच्या मुलीनं देखील एक थक्क करणारा विक्रम केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : आपल्या देशात गुणवत्तेची काही कमतरता नाही. अनेक मुलं लहान वयात वेगवेगळे विक्रम करतात. मुंबईतील एका 13 वर्षांच्या मुलीनं देखील एक थक्क करणारा विक्रम केलाय. गोरेवातल्या बानी देवसानी या चिमुरडीनं डोळ्यावर पट्टी बांधून जादुई कमाल केलीय. या विक्रमाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतंय. काय आहे विक्रम? गोरेगावातील न्यू म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या संगीता आणि संजय देवसानी यांची मुलगी बानी तिच्या कलेच्या माध्यमातून सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. बानी दोन जाड कापडी पट्ट्या बांधून उपस्थित लोकांना तिच्या हातात दिलेल्या वस्तू फक्त हाताने स्पर्श करुन वस्तू, रंग, कपडे, बॅग, नोटा, क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, बसकार्ड यांचा रंग तसेच त्यावरील नंबर याची अचूक माहिती सांगते. त्याचबरोबर मोबाईलच्या स्क्रीनवरील फोटो देखील ती बरोबर ओळखते. तिची ही अद्भुत क्षमता पाहून पाहणारे थक्क होतात. त्यांना डोळ्यावर विश्वास बसत नाही.

बानीनं याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘मेव्हरिक विथ सुपर सेन्स ही कला करत असून याला सोप्प्या भाषेत ब्लाइंड फोल्ड मॅजिक असे म्हणतात. डोळ्यावर दोन किंवा अधिक पट्टी बांधून कोणत्याही व्यक्तीच्या खिशामधून कोणतीही वस्तू दिली तर त्यावर हात फिरवून ती वस्तू ओळखता येते.’ बानीनं कोरोना काळात या कलेचं एक वर्ष प्रशिक्षण घेतलंय. आता ती वेवेगळ्या कार्यक्रमातून ही कला सादर करते. कशी झाली सुरूवात? ‘मी आणि माझी बहीण एकेदिवशी खेळत होतो. त्यावेळी डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. मी तेव्हा वेगवेगळे कलर ओळखले.  माझ्या आईनं  पाहिलं. त्यानंतर आई मला रोज बह्ममुहूर्ताच्या वेळी मेडिटेशन करायला लावत. बासरीचा आवाज ऐकवत असे. या साधनेमुळे माझ्यातील अजानचक्र ज्याला आपण तिसरा डोळा म्हणतो, ते कार्यन्वित झाले. या कलेमुळे मला मला इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, दादासाहेब फाळके पुरस्कार, ग्लोबल आयकॉनिक पुरस्कार असे 30 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेत, असं बानीनं सांगितलं. बदलापूरच्या युवा उद्योजकाची कमाल, बाप्पा निघाले सातासमुद्रपार ‘बानी डोळे बंद करुन कोणतीही गोष्ट ओळखू शकते, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हे सुरुवातीला पाहिलं तेव्हा आम्हालाही त्याचा धक्का बसला. येत्या काळात बानीनं देशाचं नाव उंचवावं, त्याचबरोबर स्वत:चं आणि कुटुंबाचं नावही जगभरात पोहचवावं, अशी आम्हा अपेक्षा आहे,’ असं तिची वडील संजय देवसानी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या