टिटवाळा, 27 नोव्हेंबर : मुंबई उपनगरातून मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्या आहेत. बस, खिसे कापून किंवा हातातून खेचून नाही तर लॉकडाऊनंतर मोबाईल चोरीसाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. आंबे काढण्याचा घळ वापरून लोकांच्या घरातले फोन चोरीला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंब्याचा घळ वापरून मोबाईल चोरताना दोन तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चोर रात्रीच्या सुमारास येऊन पाहणी करतात आणि आपल्या जवळ बांबूला जाळी बांधलेल्या फळ काढण्याच्या घळाच्या सहाय्याने मोबाइल चोरी करून पसार झाल्याचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
हे वाचा- …म्हणून सामन्याआधी शूज न घालता मैदानात उतरला भारतीय संघ, कारण वाचून कराल सलाम ही धक्कादायक घटना मुंबई उपनगर टिटवाळा परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ 20 नोव्हेंबर रोजी बनेली गावातील वस्तीतला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच पोलिसांनी परिसरात नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या गोष्टी, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू बाहेर न ठेवण्याचं आवाहन देखील केलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.