JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असेल मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mumbai News : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असेल मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

रविवारी रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक चेक करा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै :  मुंबईक रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रविवारी 09 जुलै मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तरी  प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक विद्याविहार - ठाणे 5 वी आणि 6 वी लाईन सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10.10 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

Pune News : तुम्ही कधी केबल कार, फुलराणी रेल्वे पाहिलीये का? पुण्यातला हा VIDEO पाहाच

संबंधित बातम्या

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसभराचा मेगाब्लॉक नाही माहीम जंक्शन आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान शनिवार/रविवार, 8/9 जुलै 2023 च्या मध्यरात्री 23.30 ते 04.30 वाजेपर्यंत डाऊन स्लो मार्गावर 5 तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. वळवलेल्या मार्गावर धावणाऱ्या या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे थांबणार नाहीत. तर लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर थांबतील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या