मुंबई, 10 डिसेंबर: मालाड पश्चिममधून (Malad West) एक धक्कादायक घटना (shocking incident) समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाने शेजाऱ्याची हत्या केली आहे. या हत्येचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही हत्या कारण असं आहे की, त्याने टेपरेकॉर्डरवरील (tape recorder) गाण्याचा आवाज कमी करण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपी तरुणाला इतका राग आला की त्याने रागाच्या भरात शेजाऱ्याची हत्या केली. ही हत्येची घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत सुरेंद्र गुन्नार आणि सैफ अली शेख हे दोघे मालवणी येथील अंबुजवाडी येथील एकता चाळ सोसायटीत राहतात. दोघेही मजूर म्हणून काम करायचे. बुधवारी मृत सुरेंद्र हा त्याच्या घराबाहेर टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकत होता. त्यानंतर आरोपीनं त्याला आवाज कमी करण्यास सांगितलं. मात्र सुरेंद्रनं आवाज कमी करण्यास नकार दिला. त्यानंतर या प्रकरणावरून दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत सुरेंद्रच्या डोक्याला बरीच दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सैफला सुरेंद्रला मारायचं नव्हतं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सैफ अली शेखचा सुरेंद्रला मारण्याचा हेतू नव्हता. मात्र मारामारीदरम्यान पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत गुन्नारच्या पत्नीच्या तक्रारीवरून शेख याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हेही वाचा- Covid-19 च्या लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार? आज होणार फैसला आरोपी सैफ अली शेखला न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता तेथून त्याला कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिली.