JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Local Accident : तृतीयपंथीयांच्या दगडफेकीमुळे क्रेनची लोकलला धडक, मुंबईत मोठी दुर्घटना टळली

Mumbai Local Accident : तृतीयपंथीयांच्या दगडफेकीमुळे क्रेनची लोकलला धडक, मुंबईत मोठी दुर्घटना टळली

मुंबईतील नायगाव स्थानकात लिफ्टचे काम सुरू आहे. दरम्यान हे काम सुरू असताना अचानक तृतीयपंथीयाकडून दगडफेक करण्यात आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी : मुंबईतील नायगाव स्थानकात लिफ्टचे काम सुरू आहे. दरम्यान हे काम सुरू असताना अचानक तृतीयपंथीयाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनियंत्रित झालेल्या एका क्रेनची लोकल रेल्वे गाडीला धडक लागल्याची घटना काल (दि.27) मध्यरात्री घडली. या अपघातात मोटरमन जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री नायगाव फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी रुळाला समांतर काही अंतरावर क्रेन उभी करण्यात आली होती. ब्लॉक घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते. त्याच वेळी अचानक रुळाजवळच उभ्या असलेल्या तृतीयपंथीयाने क्रेनवर जोरदार दगफेक केली.

हे ही वाचा -  ‘‘मला अजून जगायचय….’’ असं लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, पण का?

संबंधित बातम्या

त्यामुळे  चालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला क्रेन नियंत्रित करता आली नाही. त्याचवेळी मध्यरात्री बारावाजून 55 मिनीटांनी वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊन दिशेला येऊन नायगाव स्थानकात प्रवेश करत होती

क्रेन चालकाला नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे क्रेन नियंत्रित करणे कठीण झाले आणि क्रेनचे हुक लोकलच्या काचेला धडकला. त्यांमुळे  समोरील काचा फुटल्या आणि मोटरमनच्या डोक्याला मार लागला. दरम्यान, मोटरमनला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. या घटनेनंतर लोकल रिकामी करून विरार कारशेडमध्ये नेण्यात आली.  

जाहिरात

हे ही वाचा :  व्हिडीओ! समुद्रात थरार, पोलिसांची बोट अचानक खडकाला धडकली, स्थानिक देवदुतासारखे आले मदतीला

यामुळे लोकल अपघाताची मोठी दुर्घटना घडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. नायगाव स्थानकाजवळ रुळाच्या शेजारी तृतीयपंथीय बेकायदेशीर कृत्य करीत असून  रेल्वेच्या कामाला विरोध की अन्य काही कारणामुळे दगडफेक झाली याचा तपास पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या