JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'कोरोनामुळे नुकसान, चीनने 190 लाख कोटी द्यावेत'; मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

'कोरोनामुळे नुकसान, चीनने 190 लाख कोटी द्यावेत'; मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

आंतरराष्ट्रीय न्यायालयाशिवाय आशिष यांनी सर्वोच्च न्यायालयातसुद्धा चीन विरोधात याचिका दाखल केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. या संकटासाठी अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर ठपका ठेवला आहे. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच जगभरात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. बेरोजगारीची कुऱ्हाडही अनेकांवर कोसळली आहे. दरम्यान, मुंबईतील एका वकिलाने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरोधात धाव घेतली आहे. अंधेरीत राहणाऱ्या आशिष सोहानी नावाच्या वकिलाने चीन विरोधात खटला दाखल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडे धाव घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने पावले उचलली नाहीत आणि त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव देशाबाहेर होऊ दिला असे आरोप आशिष यांनी याचिकेत केले आहेत. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून चीनने 190 लाख कोटी रुपये द्यावेत अशी मागणी करणारी 33 पानांची याचिका आशिष यांनी दाखल केली आहे. आशिष सोहनी मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त प्रदीप सोहनी यांचा मुलगा आहे. 11 एप्रिल रोजी आशिष यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टात ई-याचिका दाखल करण्यासाठी पाठवली. यावर तीन दिवसांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून याचिका विचाराधीन असल्याच कळवण्यात आलं आहे. Exclusive : एकेकाळी रक्ताने माखले होते हात, आज दुसऱ्यांचा वाचवतायत जीव आंतरराष्ट्रीय न्यायालयाशिवाय आशिष यांनी सर्वोच्च न्यायालयातसुद्धा चीन विरोधात याचिका दाखल केली आहे. कलम 25(1) नुसार चीनने मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाच्या कलम 2,3,5,6,7,8 आणि 9 चे उल्लंघन चीनने केलं असल्याचा आरोप आशिष यांनी केला आहे. चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोग, हुबेई प्रांत सरकार आणि वुहान महापालिका यांचाही याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आरोग्य आयोग आणि महापालिकेने मानवतेविरोधात कृत्य केलं असल्याचं आशिष सोहनी यांनी याचिकेत म्हटलं. धारावीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहाता सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय आशिष सोहानी यांची आई मुंबई फॅमिली कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आहेत. हा व्हायरस किती भयंकर आहे, त्याची चीनला पूर्ण कल्पना होती आणि त्याचे पुरावे देखील आहेत. तरीही त्यांनी सुरुवातीच्या स्टेजमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार काही केले नाही असे आशिष यांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या