JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईची मुलगी आम्रपाली गान यांची 'Only Fans'च्या CEO पदी नियुक्ती; संस्थापकांची घेतली जागा

मुंबईची मुलगी आम्रपाली गान यांची 'Only Fans'च्या CEO पदी नियुक्ती; संस्थापकांची घेतली जागा

आम्रपाली सप्टेंबर 2020 मध्ये या कंपनीत मुख्य मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून रुजू झाली होती. अवघ्या पाच वर्षांत तिने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे

जाहिरात

आम्रपाली गान यांची यशोगाथा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  22 डिसेंबर: गेल्या काही काळात भारतीय व्यक्तींनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमधील सर्वोच्चपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आदी अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे भारतीयांची मान अभिमानाने आणखी ताठ झाली आहे. याच यादीत आणखी एका व्यक्तीची भर पडली असून, ही आहे अवघ्या 36 वर्षांची मुंबईची मुलगी (Mumbai Girl) आम्रपाली गान (Amrapali Gan). ओन्ली फॅन्स (Only Fans) या सबस्क्रिप्शन बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (Subscription based social media platform) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी (CEO) आम्रपालीची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे या आधी या पदावर या कंपनीचे संस्थापक टीम स्टोकली (Tim Stokely)कार्यरत होते त्यांच्या जागी आम्रपालीची निवड झाली आहे. आम्रपाली सप्टेंबर 2020 मध्ये या कंपनीत मुख्य मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून रुजू झाली होती. अवघ्या पाच वर्षांत तिने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे. द इंडिपेंडंटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कंपनीनं मंगळवारी (21 डिसेंबर 21) संस्थापक टीम स्टोकली हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होत असून, त्यांच्या जागी आम्रपाली उर्फ ‘अमी’ गान (Ami Gan) हिची निवड केली असल्याचं जाहीर केलं होतं. तर टीम स्टोकली यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट आम्रपालीचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती. उत्तम सहकारी असणारी ‘अमी’ गान ओन्लीफॅन्ससाठी झपाटून काम करणारी व्यक्ती आहे, असंही त्यात नमूद केलं होतं. 2016 मध्ये टीम स्टोकली यांनी ओन्ली फॅन्स या सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मची (Subscription Platform) स्थापना केली. हा प्रौढ लोकांसाठी विशेष कंटेंट पुरवणारा सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म आहे. यावर सबस्क्रिप्शन घेऊन लोक आपले फोटो, व्हिडिओ शेअर करू शकतात. त्याला भरपूर पसंती मिळाल्यास त्यांना पैसे मिळतात. सध्या या प्लॅटफॉर्म 13 कोटी युझर्स आणि 20 लाख कंटेंट क्रिएटर्स **(Content Crators)**आहेत. अल्पावधीतच कंपनीने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, कोट्यावधींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. तीव्र थंडीनंतर उत्तर भारतात पावसाचं सावट, काय असेल महाराष्ट्रातील स्थिती? ओन्लीफॅन्सच्या आधी, रेड बुल, क्वेस्ट न्यूट्रिशन आणि लॉस एंजेलिसमधील कॅनाबिस कॅफेसारख्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या आम्रपालीची या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तिनं आनंद व्यक्त केला. ही भूमिका स्वीकारल्याचा आपल्याला अभिमान आहे, असं तिनं सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘मी कंटेंट क्रिएटर्ससोबत अधिक जवळून काम करून नियंत्रित कंटेंट निर्मिती आणि भरपूर कमाई करण्यास मदत करण्याकरता उत्सुक आहे. हा प्लॅटफॉर्म अत्यंत सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही तिनं नमूद केलं आहे. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी काही वेळ सुट्टीत आनंदाने घालवण्यासाठी टीम स्टोकली यांनी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याचं आम्रपाली गानने माध्यमांशी बोलताना सांगितलं. सेक्स संदर्भातील कंटेंटवर निर्बंध घालण्याच्या निर्णय घेऊन अवघ्या पाच दिवसांत मागे घेतल्यानं गेल्या वर्षी ही कंपनी वादात सापडली होती, बँकांच्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं तेव्हा स्टोकली यांनी स्पष्ट केलं होतं. आता नवीन कोणते प्रकल्प कंपनी आणणार आहे याबाबत अद्याप काहीही माहिती त्यांनी दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या