Home /News /pune /

Weather Forecast: तीव्र थंडीनंतर उत्तर भारतात पावसाचं सावट, काय असेल महाराष्ट्रातील स्थिती?

Weather Forecast: तीव्र थंडीनंतर उत्तर भारतात पावसाचं सावट, काय असेल महाराष्ट्रातील स्थिती?

Weather Update Today: येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शीतलहरींच्या स्थितीत घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवला आहे.

    पुणे, 22 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुलाबी थंडीचा जोर सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भाग वगळता राज्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास घुटमळत आहे. येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शीतलहरींच्या स्थितीत घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवला आहे. मात्र पुढील चोवीस तासांत पूर्व भारतात किमान तापमानात लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर पूर्व भारतासह बहुतांशी भागातील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय 26 ते 29 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याने संबंधित राज्यातील अनेक भागात येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतात एकीकडे थंडीचा कहर सुरू असताना पावसाचं नवं संकट उभं ठाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचबरोबर 27 ते 29 डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड राज्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. देशात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं असल्याने येत्या तीन-चार दिवसात देशातील तापमानात किचिंतशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा देखील कमी होणार आहे. हेही वाचा- कोरोना लस घेतलेल्यांसाठी Good news; परिणाम पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत झाले महाराष्ट्रात तर आजपासूनच गारठा गायब झाला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत आलेली थंडीची लाट आज ओसरली असून संबंधित ठिकाणी किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. असं असलं तरी गेल्या चोवीस तासात नागपुरात थंडीने पाच जणांचा बळी घेतला आहे. संबंधित सर्वजण उघड्यावर वास्तव्य करणारे होते, त्यांचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाल्याचा संशय आहे. आज गडचिरोली -8.4, नागपूर -8.5, अमरावती - 8.9,  गोंदिया 9, वर्धा 9.4, ब्रम्हपुरी 10.2, पुणे 11.9, नाशिक 11.4, जालना 10.5, सातारा, 13.8 आणि मुंबई सांताक्रुझ याठिकाणी 18.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील तीन चार दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या