JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / यंदा मुंबईची शान असलेला 'लालबागचा राजा' गणेशोत्सव होणार साजरा, मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करणार गणेशोत्सव

यंदा मुंबईची शान असलेला 'लालबागचा राजा' गणेशोत्सव होणार साजरा, मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करणार गणेशोत्सव

Lalbaugcha Raja 2021: लालबागच्या राजाच्या जगभरातील करोडो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 ऑगस्ट: यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव साजरा होणार आहे. लालबागच्या राजाच्या जगभरातील करोडो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोविड 19च्या (Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “आरोग्य उत्सव” साजरा करून आदर्श निर्माण केला होता. यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर

संबंधित बातम्या

गेल्या वर्षी कोरोनाची स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र यंदा पुन्हा एकदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार आहे. यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली आखून दिली आहे. ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असंही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या