JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार आपले 'मुंबईचे डबेवाले'; 133 वर्षांचा इतिहास बदलणार! Video

झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार आपले 'मुंबईचे डबेवाले'; 133 वर्षांचा इतिहास बदलणार! Video

Mumbai Dabbawala : ऑनलाईन फुड अ‍ॅपचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसलाय. पण, त्यांनी या अडचणीतूनही मार्ग काढलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 2 फेब्रुवारी : आधुनिक तंत्रज्ञान, विविध अ‍ॅप्स यामुळे सामान्य माणसाचे जीवन अगदी सोपं झालं आहे. एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची, चार ठिकाणी फिरण्याची गरज आता राहिलेली नाही. ती घरबसल्या सहज उपलब्ध होते. याच वृत्तीमुळे ‘ऑनलाईन होम डिलिव्हरी’ ही कल्पना आपल्या देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ऑनलाईन फुड अ‍ॅपचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसलाय. पण, त्यांनी या अडचणीतूनही मार्ग काढलाय. मुंबईच्या डबेवाल्यांचं अ‍ॅप लवकरच येणार आहे. डबेवाल्यांच्या 133 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. का निर्माण झाली गरज? ऑनलाइन डिलिव्हरीचा फटका हा आधुनिक तंत्रज्ञानामुळे डबेवाल्यांना बसलाय, अशी माहिती नुतन मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली. वेगवेगळ्या फुड डिलिव्हरी ॲपचा पर्याय मोबाईलवर उपलब्ध असल्यानं ग्राहक त्याला पसंती देतायत. मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामाचा अभ्यास करुनच त्यांनी हे ॲप सुरू झाल्याचा दावा मुके करतात. Mumbai Wholesale Market : जगभरातील सर्व शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट, पाहा Video मुंबईचा डबेवाला हा 60 ते 70 किलोमीटर अंतर परिघांमध्ये डिलिव्हरी करत असतो. पण या ॲपच्या साह्याने एक डिलिव्हरी करायला अर्धा तास लागतो. त्याचवेळेत डबेवाले किमान पंधरा ते वीस डबे डिलिव्हर करतात. त्यांचा डिलिव्हरी चार्जही इतरांपेक्षा कमी आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

लवकरच ॲप येणार डबेवाल्यांच्या नावानं सध्या अनेक खोटे प्रकार बाजारात सुरू आहेत. आता लवकरच डबेवालेही आधुनिक तंत्रज्ञान वापरुन खास ॲप सुरू करणार आहेत. यामाध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्यापूर्वी मुंबईमध्ये 5000 डबेवाले कार्यरत होते. आता ही संख्या दोन हजारापर्यंत कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या डबेवाल्यांची संख्या कमी झाली असली तरी त्यांनी लढवय्या मुंबईकरांप्रमाणेच नव्या बदलाशी जुळवून घेण्याचं ठरवलं आहे. आगामी ॲप ही याची नांदी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या