JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा शिरकाव, 39 कैद्यांना कोरोनाची लागण

पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा शिरकाव, 39 कैद्यांना कोरोनाची लागण

मुंबईत (Mumbai Corona News) कोरोना (Corona Virus) रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आता चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai Corona News) कोरोना (Corona Virus) रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र त्यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या भायखळा (Byculla Jail) तुरुंगातील 39 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. गेल्या 10 दिवसांत भायखळातील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात 6 मुलांसह 39 जणाना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून भायखळ्यातील महिला कारागृहात 39 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समजतंय. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 6 लहान मुलांचाही समावेश आहे. लागण झालेल्यांना जवळच्या एका शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर त्यातल्या वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं आहे. हेही वाचा-  अमित शहांनी बोलावली बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दिशेनं रवाना सर्व कैद्यांना क्वॉरटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुन्हा एकदा कारागृहात कोरोनाबाधित आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. एकाचवेळी 39 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. हेही वाचा-  ‘‘केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा’’, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा गेल्या आठवड्यात तुरुंगात कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या कैद्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यानंतर तात्काळ लागण झालेल्या कैद्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांना देखील उपचारासाठी पाठवलं आहे. मुंबईतली रुग्णसंख्या मुंबईत गेल्या 24 तासांत 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7 लाख 17 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1195 दिवसांवर गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या