JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आपली मुंबई अशी शानदार दिसणार? BMC ने शेअर केला कोस्टल रोडचा फर्स्ट लुक VIDEO

आपली मुंबई अशी शानदार दिसणार? BMC ने शेअर केला कोस्टल रोडचा फर्स्ट लुक VIDEO

देशातला सर्वांत सुंदर रस्ता मुंबईत तयार होत आहे. पूर्ण झाल्यावर कसा दिसेल कोस्टल रोड त्याची ही झलक… पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी : बहुचर्चित मुंबई कोस्टर रोड प्रकल्पाचं काम जोरदार सुरू आहे, हे सांगणारा एक VIDEO मुंबई महानगरपालिकेनं शेअर केला आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा दक्षिणेकडच्या भागाची झलक दाखवणारा हा व्हिडीओ आहे. आजच मांडलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोड साठी 2000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 2022 वर्षअखेरीपर्यंत या कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राइव्ह हा रस्ता खुला करण्याची डेडलाइन ठेवण्यात आली आहे. या कोस्टल रोडचा दक्षिणेकडचा भाग मरीन लाइन्स भागातल्या प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होईल आणि बांद्रा वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकावर संपेल. 10 किलोमीटरचा हा रस्ता 4 लेन्सचा असणार आहे. त्यातली एक लेन BRT आणि रुग्णवाहिकेसाठी असेल. या रस्त्यालगत 1800 गाड्यांची सोय होईल असे प्रशस्त पार्किंग लॉटही उभारण्यात येणार आहेत. चार ठिकाणी पार्किंगच्या जागा असतील. मुंबई महापालिकेनं यासंबंधी ट्वीट करत माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

मरीन ड्राइव्ह, हाजीअलवी, अमरसन्स आणि वरळी असे चार भाग आणि चार ठिकाणी इंटरचेंजची सुविधा या प्रशस्त आणि शानदार कोस्टल रोडला असेल. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात या कोस्टल रोडला परवानगी मिळाली होती. पण पर्यावरणाच्या हानीच्या कारणास्तव आणि काही नागरिकांच्या विरोधामुळे या कोस्टल रोडच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठल्यानंतर आता कोस्टल रोडचं काम जोरदार सुरू आहे. कसा दिसेल कोस्टल रोड त्याची ही झलक…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या