मुंबई, 2 जुलै: मुंबई बँकेत (Mumbai Bank) झालेल्या बोगस कर्ज वाटप प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देत प्रविण दरेकर यांनी आपलं मौन सोडंल आहे. आपल्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाहीये आणि चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. 123 कोटींचा घोटाळा आला कुठून वर्तमान पत्रात बातम्या येत आहेत की मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहेत. मात्र, हा 123 कोटी रुपयांचा आकडा आला कुठून असा सवालही दरेकरांनी विचारला आहे. प्रविण दरेकर यांनी म्हटलं, कर्ज वाटपाच्या संदर्भातील कोणताही निर्णय माझा वैयक्तिक नाही, निर्णय संचालक मंडळाच्या परवानगीने घेण्यात आले होते. चौकशीला सामोरं जाण्यास तयार असून 100 टक्के चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असून हा हवेत बाण मारण्याचा प्रयत्न आहे. ठरवून काही लोकांनी बातम्या बनवल्या आहेत. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचंही यावेळी प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. मुंबै बँक ही अत्यंत चांगलं काम करत आहे. मुंबै बँक राज्यातील अव्वल बँक, अ वर्ग दर्जाची बँक आहे. ठेविदारांचा आमच्यावर विश्वास आहे. माझ्यावर खोडसाळपणे आरोप केले जात आहेत. पंकज कोटेजा जे यात मुख्य आहे. या तक्रारीचे उगमस्थान राजकीय आहे. प्रकाश सोळंकी यांच्याकडून जाणीवपुर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला पण यातून काहीच साध्य झाल नाही असंही दरेकरांनी म्हटलं आहे. प्रविण दरेकरांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे मुंबै बँकेत कोणताही गैरव्यवहार नाही 5 याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही कोणताही निर्णय माझा वैयक्तिक नाही निर्णय संचालक मंडळाच्या परवानगीने चौकशीला सामोरं जाण्यास तयार चौकशीला 100 टक्के सामोरं जाणार माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा तर हवेत बाण मारण्याचा प्रयत्न ठरवून काही लोकांनी बातम्या बनवल्या मुंबै बँक ही अत्यंत चांगलं काम करत आहे मुंबै बँक राज्यातील अव्वल बँक, अ वर्ग दर्जाची बँक ठेविदारांचा आमच्यावर विश्वास खोडसाळपणे आरोप केले जात आहेत जरंडेश्वर साखर कारखान्याकडेही पैसे थकीत आहेत