मुंबई, 12 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताचं दैवत आहे. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक मावळ्यांनी भक्कम साथ दिली. आज साडेतीनशे वर्षानंतर महाराजांवरील महाराष्ट्राची निष्ठा कमी झालेली नाही. राज्यातील सर्व जाती, धर्मातील मंडळींना शिवाजी महाराज हे वंदनीय आहेत. मुंबईतील मेहबुब हुसेन हे यापैकी एक कट्टर शिवप्रेमी आहेत. ते गेल्या 27 वर्षांपासून कोणतंही मानधन न घेता शिवकालीन वारसा जपण्याचं काम करत आहेत. मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्त झाला की राजवाड्यात नौबत वाजवला जायचा आणि त्याचबरोबर राजवाड्याचे दरवाजे बंद केले जायचे. नौबत वाजवण्याची परंपरा मराठा साम्राज्यात सुरू झाली. अशाच प्रकारे नित्यनियमाने मानवंदना देण्याचे काम मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे सूर्यास्ताच्या वेळी केले जाते. कुलाबामध्ये राहणारे मेहबूब हुसेन गेल्या 27 वर्षांपासून हे काम नियमितपणे करत आहेत. कट्टर शिवप्रेमी कट्टर शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांचे कुटुंबीय हे कर्नाटकचे आहेत. त्यांचे वडिल कामानिमित्त धारवाडहून मुंबईत आले. मेहबूब यांचा जन्म मुंबईतच झाला. ‘गेटवे ऑफ इंडिया येथे 1982 पासून नौबत वाजवली जात आहे. 1996 पर्यंत बाबुराव दीपक जाधव नौबत वाजवत. त्यानंतर त्यांना नौबत वाजवणं शक्य नसल्याने हे काम माझ्याकडे आले,’ असं 57 वर्षांचे मेहबूब सांगतात. मेहबूब गेली 27 वर्ष रोज सुर्यास्ताच्यावेळी ही नौबत वाजवतात. स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी… शिवाजी महाराजांबाबत तरुणानं रक्तानं लिहिलं राष्ट्रपतींना पत्र मानधनाशिवाय काम मेहबूब यांना या कामाचे मानधन मिळत नाही. ते शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी गेली 27 वर्षे हे काम करत आहेत. उदरनिर्वाहासाठी ते कधी गेट वे ऑफ इंडिया येथे पाण्याची बॉटल, चणे फुटाणे तर कधी फिरून वस्तू विकतात. कुलाबा नेव्ही नगर येथील गीतानगर येथे ते एकावर एक मजला बांधलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत कुटुंबासह राहतात. ‘मी गेली 27 वर्षे कोणत्याही अपेक्षेविना करत आहे. मला महाराष्ट्र शासनाकडून कोणतंही मानधन दिलं जात नाही. मानधन आहे पण मी मानधन घेत नाही. माझ सौभाग्य आहे मी महाराजांची नौबत वाजवतो. असं मेहबूब सांगतात. त्यामुळे, आता या मेहबूब इमाम यांना येणारे पर्यटक ‘महाराजांचा मेहबूब’ म्हणून ओळखतात. IAS अधिकाऱ्यानं एकलव्यासारखी केली चित्रकलेची साधना, पाहा Video छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्येक मावळा जीवापाड प्रेम करत होता. आता साडेतीनशे वर्ष उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रुपाने निष्ठावंत मावळा महाराजांवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहे. शिवाजी महाराजांची नौबत वाजवायला मिळणे हे माझं भाग्य आहे. मी शिवप्रेमी आहे. समजायला लागलं तेव्हापासून शिवजयंती साजरी करत आहे. मला कोणाकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही. माझ्यानंतर हे नौबत कोण वाजवेल हे अल्लालाच ठाऊक, मात्र, मी जिवंत आहे तोपर्यंत मी नौबत वाजवणे थांबवणार नाही," असं मेहबूब यांनी सांगितलं.