JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Unlock Updates: टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मांडले 'हे' मत; मुख्यमंत्री काय घेणार निर्णय?

Maharashtra Unlock Updates: टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मांडले 'हे' मत; मुख्यमंत्री काय घेणार निर्णय?

CM Uddhav Thackeray Meeting with Task Force: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

जाहिरात

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : राज्यातील कोरोना (Corona) बाधितांची संख्या आता कमी झाल्याचं दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या ही आटोक्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या अद्यापही काही प्रमाणात आहे. एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत आहे त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल (Maharashtra restrictions relaxation) करण्याची मागणी होत आहे. याच संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स **(Task Force)**सोबत बैठक घेतली. या बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आपले मतं मांडले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टास्क फोर्समधील तज्ज्ञ समितीतील काही डॉक्टरांनी आपले मत नोंदवत म्हटलं की हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात यावे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे तेथे शिथिलता नको असेही मत या डॉक्टरांनी मांडले आहे. यासोबतच 15 ऑगस्टपर्यंत सर्व अंदाज घ्या आणि त्यानंतर संपूर्ण मूभा द्यायची की नाही या संदर्भातील विचार करा असंही टास्क फोर्समधील काही डॉक्टरांनी म्हटलं आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी हळूहलू शिथिलता देण्यासंदर्भात आपलं मत मांडलं असून 15 ऑगस्टपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण मूभा देण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘पूरग्रस्तांसाठी अधिकची मदत मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणणार, मदत मिळेपर्यंत संघर्ष करणार’ लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय? मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून आणि प्रवासी संघटनांकडून सुरू आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील रुग्णसंख्याही आटोक्यात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याच दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोकाही वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविल्यास तिसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्या ऐवजी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या