JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आरोग्य विभागात 25 हजार जणांची भरती करणार

राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आरोग्य विभागात 25 हजार जणांची भरती करणार

कोविड19 महामारीचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. अशा गोष्टींना सरकार चाप लावणार आहे. कुठल्या गोष्टींना किती शुल्क आकारावं हे निश्चित करण्यात आलं आहे.

जाहिरात

Pune: Medical staff pastes a notice on prevention against coronavirus, at the isolation ward of Naidu Hospital, in Pune, Wednesday, March 4, 2020. (PTI Photo)(PTI04-03-2020_000167B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 06 मे: कोरोनाच्या नावाखाली अवाजवी दर लावत रुग्णांकडून पैसे लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला सरकारने चांगलाच दणका दिला आहे. अशा गोष्टींना चाप लावण्यात येणार असून सर्व दर हे ठरवून दिले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागात 25 हजार भरती करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्या नंतर आरोग्य क्षेत्रातील एकही जागा आता रिक्त ठेवणार नाही. सर्व कर्मचारी वर्ग भरण्यासाठी तात्काळ संबधीत सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. प्रमोशन देखील तात्काळ करण्यात येणार आहेत. यात येत्या काही महिन्यांमध्ये 25 हजार भरती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग अशा सर्वांचे रिक्त जागा भरण्यात येणार.’ आरोग्य मंत्री म्हणाले, कोविड19 महामारीचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. अशा गोष्टींना सरकार चाप लावणार आहे. यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. कुठल्या गोष्टींना किती शुल्क आकारावं हे निश्चित करण्यात आलं आहे. त्याच्या बाहेर आता खासगी हॉस्पिटल्सला आता जाता येणार नाही. नाहीतर आम्ही कारवाई करणार आहोत. विविध जिल्ह्यात अडकलेले नागरिक कसे पोहोचणार घरी? सरकारनं घेतला मोठा निर्णय ते पुढे म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी दुपारी सखोल चर्चा झाली. आम्ही सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या सूचनांची पूर्ण पालन करण्यात येत असून नवे उपाय योजण्यात येणार आहेत. आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल लॅबवर देखील लोड येत आहे. नवीन रुग्णांच्या टेस्ट करणं देखील महत्वाचं आहे. क्वारंटाइनचा 14 दिवसांचा कालावधी कमी करण्यात येऊ शकतो का? या संदर्भात ICMR नियमावली जाहीर करणार आहे. 1 लॅब वरून आता 54 लॅब सुरू केल्या आहेत. राज्यात दररोज 10 हजार टेस्ट होत आहेत. महाराष्ट्र हे रुग्णांच्या टेस्ट करण्यात क्रमांक एक वर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या