JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63,894 वर, 349 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63,894 वर, 349 जणांचा मृत्यू

.सध्या राज्यातील मृत्यू दर 1.7 टक्के एवढा आहे. पण, गेल्या काही दिवसांतील आजची संख्या ही पुन्हा एकदा 60 हजार पार पोहोचली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल : राज्यात कोरोनाचे (Maharashtra Corona Update) संकट आता आणखी गडद होत चालले आहे. एकीकडे लॉकडाऊन (Maharashtra lockdown) लावण्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 63,894 रुग्णांची भर पडली आहे तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज  34,008 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 27,82,161 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.65 एवढा आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये  राज्यात 63,294 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 349 कोरोनाबाधित रुग्णाांचा मृत्यू झाला आहे. .सध्या राज्यातील मृत्यू दर 1.7 टक्के एवढा आहे. पण, गेल्या काही दिवसांतील आजची संख्या ही पुन्हा एकदा 60 हजार पार पोहोचली आहे. सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर 25,694 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 5,65,587  ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊनची उद्या घोषणा दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन  लावण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल बैठकांचे सत्र सोमवारपर्यंत सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) उद्या लॉकडाऊनबद्दल निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा केली होती. याबैठकीमध्ये लॉकडाऊन किती दिवस लावायचा याबद्दल चर्चा झाली. परंतु, लॉकडाऊन बाबत बैठकांचे सत्र सोमवार ही सुरू राहणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थ खात्यासमवेत बैठक घेणार आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन लागू केल्यास इतर अर्थव्यवस्था काय परिणाम होणार तसंच गोरगरीब लोकांना लॉकडाऊन कालावधीत काही दिलासा देता येतो का यावर चर्चा होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या