JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : काळजी घ्या, Corona पुन्हा पसरतोय; राज्यात नवी रुग्ण संख्या आली समोर

BREAKING : काळजी घ्या, Corona पुन्हा पसरतोय; राज्यात नवी रुग्ण संख्या आली समोर

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

जाहिरात

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जून : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व जणांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पण आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (maharashtra corona cases) संख्या 1081 वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्येही 739 रुग्ण आढळून आले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वाढत चालली आहे. राज्यामध्ये कोरोनाबाधित नवीन रुग्णाची संख्या 1081 आढळली आहे. एकाच दिवसामध्ये ही रुग्ण संख्या आढळली आहे. तर राज्याभरात  एकूण ४०३२ ॲक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आज ५२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तसंच राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आह.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७% एवढे झाले आहे. तर,  मुंबई महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील  २४ तासांमध्ये बाधित रुग्णांची संख्या ७३९ आढळून आली आहे. तर २४ तासांमध्ये बरे झालेले रुग्णांची २९५ आहे. आतापर्यंत एकूण १०४४००५ रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९८ टक्के आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही २९७० इतकी आहे. कोविड वाढीचा दर हा २५  ते ३१ मे या कालावधीमध्ये ०.०३३ टक्के इतका होता. पावसाळ्यापूर्वीच कोरोना रूग्णाचे वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेच्या यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयांना अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जम्बो कोविड सेंटरही सज्ज करण्याची तयारी केली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बीएमसीकडून आता युध्दपातळीवर कोरोना टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर काही खास निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे नवे निर्देश मुंबईतील कोरोना टेस्टची संख्या वाढवणार 12 ते 18 वयोगटातील लसीकरण वाढवावे बुस्टर डोसची संख्या वाढवावी जम्बो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत मालाडचे जम्बो कोविड सेंटर प्राधान्यानं सज्ज होणार वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात आपातकालिन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल. मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही.  वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज ठेवण्याची सूचना दिली आहे.   येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो प्राधान्याने सुरू करण्यात येईल. प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे ठोस हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. तसंच, पालिका आयुक्त पावसाळ्यासाठी तयार आहेत का हे पाहण्यासाठी जम्बो रुग्णालयांना भेट देतील जेणेकरून ते डी-वॉटरिंग पंप, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा यंत्रणा, हाऊस किपिंग, कॅटरिंग, पॅरामेडिकल आणि वैद्यकीय कर्मचारी, O2 उत्पादन संयंत्रे आणि औषधांसह पूर्णपणे सुसज्ज आहेत हे सुनिश्चित करण्यात येणार आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात आपातकालिन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल. मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही.  वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज ठेवण्याची सूचना दिली आहे.   येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो प्राधान्याने सुरू करण्यात येईल. प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे ठोस हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. तसंच, पालिका आयुक्त पावसाळ्यासाठी तयार आहेत का हे पाहण्यासाठी जम्बो रुग्णालयांना भेट देतील जेणेकरून ते डी-वॉटरिंग पंप, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा यंत्रणा, हाऊस किपिंग, कॅटरिंग, पॅरामेडिकल आणि वैद्यकीय कर्मचारी, O2 उत्पादन संयंत्रे आणि औषधांसह पूर्णपणे सुसज्ज आहेत हे सुनिश्चित करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या