विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव...
मुंबई, 26 जुलै: महाडचे (Mahad) माजी आमदार (Former MLA) तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (Congress) माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे आज मुंबई (Mumbai) येथे दुःखद निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज महाड येथे दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव कॅप्टन जगताप बंगला, नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी माणिकराव राव जगताप यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
आणखी एका ट्विटमध्ये अशोक चव्हाणांनी म्हटलं, माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.