JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कस्तुरबा रुग्णालयातील LPG प्लांट मध्ये गळती, रुणांना दुसऱ्या इमारतीत हलवलं, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी

कस्तुरबा रुग्णालयातील LPG प्लांट मध्ये गळती, रुणांना दुसऱ्या इमारतीत हलवलं, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी

कस्तुरबा रुग्णालयातील (Kasturba Hospital) LPG प्लांटमध्ये गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑगस्ट: कस्तुरबा रुग्णालयातील (Kasturba Hospital) LPG प्लांटमध्ये गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कुणालाही दुखापत झाली नाही आहे. गॅस गळती झाल्याची माहिती मिळताचा तातडीनं अग्निशम दलाला पाचारण करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल बोर्डाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच ज्या ठिकाणी गॅस गळती झाली आहे. त्याठिकाणी रुग्णांची संख्या जास्त नव्हती. तेथील रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये नवा वाद; प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद दिल्ली दरबारी, पक्षात लॉबिंग सुरु चिंचपोकळीच्या साने गुरुजी रस्त्यावर असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात ही घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही आहे. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात एलपीजी प्लांटमधून गॅसची गळती झाली, असं वृत्त समोर आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या