मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी (NCB) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचयावर निशाणा साधताना दिसत आहेत. समीर वानखेडेंवर नवाब मलिक एका मागे एक आरोप करत आहेत. दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी एका बारचे फोटोज शेअर करत त्याचे मालक समीर वानखेडे असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपावर आता समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विट करत दोन फोटोज पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट आहे जेथे बार असल्याचा दावा केला गेलाय तर दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार असे लिहिलेलं दिसत आहे. हे फोटो ट्विट करत क्रांती रेडकर यांनी म्हटलं, पुन्हा एकदा फर्जीवाडा… एक जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती असं कसं वागू शकते?
मलिकांचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 19 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला होता. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच वानखेडे यांनी आपल्या संपत्तीविषयीची खरी माहिती केंद्र सरकारला दिली नाही, असाही आरोप मलिक यांनी केला. वाचा : समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार? जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरू नवाब मलिक नेमकं काय म्हणाले? “समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते आणि फर्जीवाड्यात ते माहीर होते. मी एक कागद शेअर केला आहे. तो कागद मला उत्पादन शुल्क विभागातने दिला आहे. त्या कागदात तुम्ही बघाल तर 1997 आणि 1998 सालाचं जो ठाणे जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन आहे, त्यामध्ये लायसन्स नंबर 875 असं असून सद्गुरु हॉटेल नावाने दारुच्या दुकानाचा परवाना जारी करण्यात आला होता. जो परमीट देण्यात आला होता तो समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने देण्यात आला होता. ते परमीट 1997 पासून समीर वानखेडेंच्या नावाने रिन्यू झालं होतं. शेवटचं रिनेवल हे 2022 पर्यंतसाठी करण्यात आलं आहे. त्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त पैसे भरण्यात आले आहेत”, असा दावा नवाब मलिक यांनी केला. वाचा : आर्यनकडे ड्रग्स सापडले नव्हते, हायकोर्टाच्या निरीक्षणामुळे समीर वानखेडे तोंडावर आपटले! समीर वानखेडे खंडणीबाज आता निलंबित कराच! : मलिकांची मागणी ‘आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता समीर वानखेडे यांना निलंबित करा , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘हायकोर्टाच्या निकालानंतर आर्यन खान आणि इतर जणांकडून कोणतेही ड्रग्स मिळाले नाही. मी सुरुवातीपासूनच हे सांगत होतो. आर्यन खानचे अपहरण करूण खंडणीसाठी प्लॅन रचण्यात आला होता. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असं मलिक म्हणाले.