JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'माझी विनंती आहे, घरी परत या...'; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर

'माझी विनंती आहे, घरी परत या...'; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर

‘भाजप गाजर दाखवत आहेत. शिंदे साहेब परत या.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad) महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 32 शिवसेना आमदार आणि 4 अपक्ष आमदार असल्याची सूत्रांची माहीती आहे. दरम्यान महाराष्ट्रभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक नेते मंडळी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरही अभिवादन करीत आहे. दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. एकनाश शिंदे यांच्या बंडामुळे त्या खूप दुखी झाल्याचं दिसत होतं. डोळ्यात अश्रू आणून त्या शिंदेना परत घरी येण्याची विनंती करीत होत्या काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर …. या गोष्टींनी वेदना होत आहेत. दर दहा वर्षांनी या गोष्टींचा सामना करावा लागतोय. भाजप गाजर दाखवत आहेत. शिंदे साहेब परत या.  उद्धव ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील. किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या आहे. भाजपकडून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर दहा वर्षांनी असं चित्र पाहावलं लागतय, वारंवार हे दिवस दाखवू नका. आमचं घर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदेनी त्याला बळी पडू नये. भाजपकडून गाजर दाखवलं जात आहे. शिवसेनेवरील हे संकट नसून ही कूटनीती आहे. उद्धव ठाकरे हे कामाने उत्तर देतात. एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पुन्हा घरी परत या अशी भावनिक साद किशोरी पेडणेकरांनी त्यांना घातली आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरील दिवाही कमी जास्त होत आहे. यावरुन या सर्व प्रकरणाचा बाळासाहेबांनाही त्रास होत असेल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या