JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai news: वाईनवाली वृषाली Instagram वर कशी झाली स्टार? आता पोहचली लंडनला, तिची कहाणी तिच्याकडून ऐका VIDEO

Mumbai news: वाईनवाली वृषाली Instagram वर कशी झाली स्टार? आता पोहचली लंडनला, तिची कहाणी तिच्याकडून ऐका VIDEO

कल्याणची वृषाली आता इन्स्टाग्रामवर मोठी स्टार झालीय. कल्याण ते लंडन या प्रवासाबद्दल तिनं अनुभव सांगितला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 1 मे : सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामुळे या व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची नेहमी चर्चा होत असते. या कलाकारांपैकी एक कल्याणमध्ये राहणारी वृषाली जावळेही आहे. इन्स्टाग्रामवर  वृषाली जावळे ही तरुणी खूप चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या कंटेंटमुळे. यामुळे वृषाली जावळे ही इन्स्टाग्रामवर खूपच लोकप्रिय झाली असून तिचे लाखों फॅन फॉलोअर्स आहेत. कोण आहे वृषाली जावळे ? कल्याणमध्ये राहणारी तरुणी वृषाली जावळे हिचे इन्स्टाग्रामवर वाईन वाली या नावाने अकाउंट आहे. या अकाउंटचे लाखों फॅन फॉलोअर्स असून ती सोशल मीडियावर स्टार झाली आहे. रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेचं शिक्षण घेऊन वृषालीने वकिलीचे सुद्धा शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर वृषालीने पुढील शिक्षणासाठी थेट परेदश गाठलं आहे. सध्या ती लंडन मधील ब्रूनल महाविद्यालयातून मार्केटिंगमध्ये मास्टर करत आहे.

अभिनयाची आवड  बालपणापासूनच अभिनयाची आवड तिला होती. अनेक एकांकिका, नृत्य, नाटकांमध्ये तिने काम सुद्धा केलं आहे. यासाठी बराच विरोध तिला सहन करावा लागला. तिच्या घरच्यांची इच्छा होती की आपल्या मुलीने नोकरी करावी. परंतु वृषाली जावळेने 2018 साली कंटेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला. सध्या वृषाली जावळे ही इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झाली आहे. वृषाली जावळे हीने मराठी नाटकांमध्ये अभिनय केला आहे. कंटेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला लहान पणापासून मला अभिनय करायचा छंद आहे. मात्र यासाठी घरातून बराच विरोध होता. मात्र, मी 2018 साली कंटेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला. पण या क्षेत्रात खऱ्या अर्थानं लॉकडाऊनमध्ये काम करायला सुरुवात झाली. सुरुवातीला यूट्यूबवर व्हिडिओ बनवीत होते. मात्र हवं तसं  समाधान मिळत नव्हतं. तसच ते खर्चिक पण होतं. त्यामुळे 2020 कोरोनामध्ये घरी असल्यामुळे इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये मला यश मिळालं, असं वृषाली जावळे सांगते.

निळू फुलेंची भेट ठरली टर्निंग पॉईंट, सामान्य कुटुंबातील मुलगी बनली अभिनेत्री, Video

संबंधित बातम्या

बोलणं बंद केलेले आहे नाटक क्षेत्रात ज्यावेळी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी घरच्यांचा विरोध होता. मात्र आत्ता सर्व दृष्टीने पालक पाठिंबा देतात. मात्र आजही घरातील काही व्यक्ती आणि सदस्य यांनी या गोष्टीला धरून माझ्याशी बोलणं बंद केलेले आहे. अशा वेळेला फार दुःख होतं कारण एकीकडे समाजातून एक वेगळी ओळख मिळत असते. मात्र, घरातीलच काही सदस्यांकडून पाठिंबा मिळत नाही अशावेळी बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करावे लागतात, असंही वृषाली सांगते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या