JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Kala Ghoda : प्रवेशद्वारातूनही दिला सामाजिक संदेश, तुमच्या लक्षात आला का? Video

Kala Ghoda : प्रवेशद्वारातूनही दिला सामाजिक संदेश, तुमच्या लक्षात आला का? Video

Kala Ghoda Art Festival 2023 : मुंबईच्या प्रसिध्द काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल मध्ये यंदा साकारण्यात आलेले मुख्य प्रवेशद्वार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी  मुंबई, 10 फेब्रुवारी :  मुंबई च्या प्रसिध्द काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल मध्ये यंदा साकारण्यात आलेले मुख्य प्रवेशद्वार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सुमित पाटील या कलाकाराने तयार केलेल्या या प्रवेशद्वाराची सगळीकडे चर्चा आहे. सुमितचे शंभरावे आर्ट इन्स्टॉलेशन आहे. या प्रवेशद्वारातून एक्ससेबल इंडियाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. सुमितच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली आहे. काय आहे संदेश? अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 3 टक्के व्यक्ती दिव्यांग आहेत. शारीरिक आणि मानसिक अंपगत्व असणारे लोक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला, ऍसिड पिडीत तसेच तृतीयपंथी अशा सर्व व्यक्तींना वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास खऱ्या अर्थाने भारत सुगम्य आणि सुसज्ज होईल. काळा घोडा येथील ‘‘गेटवे ऑफ इंडिया’‘ची प्रतिकृती हाच संदेश देत आहे.

उपाय ही काळाची गरज  शाळा, दवाखाने, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वयंचलित रॅम्स तसेच सहज वावरता यायला पाहिजे. यासाठीच्या सोयी, रस्त्यावर दिव्यांग विशेषतः दृष्टीबाधित व्यक्तींना सिग्नल कळावा यासाठी स्वयंचलित सिग्नल, इमारती फुटपाथ, उतार, वळणे या सर्व ठिकाणी सुयोग्य रॅम्प्स, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार यासाठीचे उपाय ही काळाची गरज असल्याचे सुमित पाटील सांगतो. लोकांचा प्रतिसाद अतिशय वेगळा काळा घोडा हे कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे व्यासपीठ आहे. लोकांचा प्रतिसाद हा अतिशय वेगळा आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस हा या इन्स्टॉलेशन सोबत फक्त फोटोच काढत नसून त्याच्याबरोबर आपलं एक नातं जोडून जात आहे आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असंही सुमित पाटील याने सांगितले.

Generic Aadhaar : ठाण्याच्या तरुणाच्या कल्पनेमुळे लाखो रुग्णांचा होतोय फायदा, पाहा Video

संबंधित बातम्या

सुलभ सहज प्रवास केवळ अपंगाचीच नव्हे तर सर्वाची गरज आहे. शाळा, हॉटेल्स, सिनेमागृह, सार्वजनिक उद्याने, वैद्यकीय उपचार केंद्र, औषधविक्रीची दुकाने (औषधांचे पॅकेट) मॉल्स अशा सर्वच ठिकाणी दिव्यांगांसह सर्व व्यक्तींना सुलभ भाणि सुगम्य वातावरण निर्मिती हे प्रगतीशील भारताची नांदी ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या