JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai : वडापावचा 'जुगाडी अड्डा' एकाच ठिकाणी आहेत 30 पेक्षा जास्त पर्याय, Video

Mumbai : वडापावचा 'जुगाडी अड्डा' एकाच ठिकाणी आहेत 30 पेक्षा जास्त पर्याय, Video

मुंबईकरांचे आवडते फास्ट फुड असलेल्या वडापावलाही जुगाड करत नवं रुप देण्यात आलं आहे. वडापावच्या या जुगाडी अड्डामध्ये 30-35 प्रकारचे वडापाव मिळतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर :  मुंबईमध्ये वावरताना अनेक गोष्टी या डोकं लावून केलेल्या दिसतात. मुंबईतील भाषेत जुगाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोष्टी पाहून आपण अनेकदा थक्क होतं. कधी अगदी साध्या गोष्टीतून तर कधी कुणी कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीनं हा जुगाड जमवला जातो. मुंबईकरांचे आवडते फास्ट फुड असलेल्या वडापावलाही जुगाड करत नवं रुप देण्यात आलं आहे. वडापावच्या या जुगाडी अड्डामध्ये 30-35 प्रकारचे वडापाव मिळतात. कोणते वडापाव मिळतात? जुगाडी वडापावमध्ये देशी वडापावला परदेशी चटण्यांचा झटका देऊन बर्गरसारखंच ट्रीट करत वडापाव मध्ये विविध परदेशी भाज्या टाकल्या जातात. जंतर मंतर वडापाव , गॉड फादर वडापाव , व्हीआयपी वडापाव, इंडि - इटालिया वडापाव, टँगी सनी वडापाव, मचायेंगे वडापाव अशा अजब नावाचे वडापाव इथं मिळतात. येथील वडा आणि पावमध्ये फार फरक नसतो. अगदी बाहेर मिळतो तसाच वडा असतो मात्र पावावर विविध परदेशी चटण्या आणि सॉसेसचा मारा केल्यावर या वडापावची टेस्ट बदलते. प्रत्येक वडापावमध्ये वेगवेगळ्या चटण्या वापरल्या जातात. लेट्यूस, शिमला मिर्ची, कांदा, टोमॅटो, भाज्या सुद्धा वापरल्या जातात. संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video जुगाडी अड्डा नाव का? येथे मिळणारा प्रत्येक वडापाव हा जुगाड करून बनवला जातो. तसेच त्यासाठी लागणाऱ्या चटण्या आणि सॉस परदेशी असले तरी त्याची टेस्ट जुगाड करूनच तयार केली आहे. त्यामुळे त्याला जुगाडी अड्डी असं नाव आहे. जुगाडी अड्ड्यावर मिळणारा वडापाव जम्बो असतो. अगदी 15 रुपये ते 60 रुपयांपर्यंत येथे वडापाव मिळतो. व्ही. आय. पी. वडापाव, इंडि - इटालिया वडापाव आणि जंतर मंतर वडापाव खाण्यासाठी इथं गर्दी असते. भट्टी वडापावची चव सर्वांपेक्षा वेगळी, एकदा खाल्ला तर… Video

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

किती वाजता सुरु होतो अड्डा? सकाळी 11 वाजता जुगाडी अड्डा सुरू होतो आणि रात्री 10 पर्यंत सुरु असतो. ग्राहक दिवसभर येतात मात्र संध्याकाळी आमच्याकडे वडापाव खाण्यासाठी लोकं गर्दी करतात. लोकांना इथली टेस्ट खुप आवडते असं दुकानातील कर्मचारी संदीप याने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या